मुरूमच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये महा बोंडला साजरा
सोमेश्वरनगर - बारामती तालुक्यातील मुरूम येथील असणाऱ्या जिल्हा परिषद शाळेमध्ये महाभोंडलाचे आयोजन बुधवार दि १८ रोजी केले होते यामध्ये महिला पालकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला
अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून सुरू होण्यात होणाऱ्या नवरात्री उत्साहात जितके महत्त्व आहे तितकेच महत्त्व अश्विन पक्षात हस्त नक्षत्रापासून सुरू होणाऱ्या भोंडला या सणाला आहे हत्ती हा समृद्धीचे प्रतीक मानला जातो त्यामुळे त्याची पूजा करून घरात समृद्धी येते अशी आख्यायिका आहे पूर्वीच्या काळी महिलांचे चूल आणि मूल या पलीकडे काही जगण्याचा हेतू नव्हता अशा वेळी या सणाच्या निमित्ताने महिला आपल्या सखी मैत्रिणींना भेटून एकमेकांची सुखदुःखे वाटत आणि हाच वारसा जपण्यासाठी मुरूम परिसरातील महिला यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवून जिल्हा परिषद शाळेमध्ये महाबोंडला चे आयोजन करण्यात आले व हा मोठ्या उत्साहात पार पडला या कार्यक्रमास मुरूम गावातील महिला वर्ग सर्व शिक्षिका, विद्यार्थी यांनी आपला उस्फूर्त सहभाग नोंदवला ..भोंडल्याची आरती , गाणी ,गरबा तसेच दांडिया खेळला गेला उत्तरार्धात खिरापत ओळखण्याचा कार्यक्रम झाला.