Type Here to Get Search Results !

सोमेश्वरनगर ! काकडे महाविद्यालयात मराठी वाङ्‌मय मंडळाचे उद्घाटन व वाचन प्रेरणा दिन साजरा

 काकडे महाविद्यालयात मराठी वाङ्‌मय मंडळाचे उद्घाटन व वाचन प्रेरणा दिन साजरा 
सोमेश्वरनगर - भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जन्मदिनानिमित्त १५ ऑक्टोबर २०२३ चे औचित्य साधून मु सा काकडे महाविद्यालयातील मराठी विभागाच्या वतीने मराठी वाङ्‌मय मंडळाचे उद्घाटन व वाचन प्रेरणा दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या निमित्ताने महाविद्यालयात ग्रंथालयाच्या वतीने मराठी साहित्यावर आधारित ग्रंथप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी प्रसिद्ध साहित्यिक प्रा. व. बा. बोधे यांचे विशेष व्याख्यान आयोजित केले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन माननीय प्रा. व. बा. बोधे, महाविद्यालयाचे प्राचार्य माननीय डॉ. देविदास वायदंडे तसेच सचिव श्री. एस. एम. लकडे यांनी दीपप्रज्वलन व डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन करून केले. याप्रसंगी मराठी विभाग प्रमुख डॉ. जया कदम यांनी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे माननीय प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे हे होते. याप्रसंगी ते म्हणाले की, “विद्यार्थ्यांना एकाग्रता वाढवायची असेल तर पुस्तक वाचण्याची सवय असणे फार महत्त्वाचे आहे. कारण पुस्तक हे माणसाचे मस्तक मानले जाते. पण आज मोबाईलच्या अतिवापरामुळे वाचन संस्कृतीचा ऱ्हास होताना दिसतो.”
   'वाचन प्रेरणा दिन' या दिवसाचे महत्त्व विशद करताना प्रा. व. बा. बोधे यांनी आपल्या व्याख्यानात डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या 'अग्निपंख' या पुस्तकाचा दाखला देत विद्यार्थ्यांना वाचनाचे महत्व सांगितले. तसेच आपण विद्यार्थ्यांना फक्त लिहियाला, वाचायला न शिकविता त्यांना ऐकायलाही शिकवले पाहिजे हे नमूद केले. 
मराठी वाङ्‌मय मंडळाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये मराठी भाषेबद्दल जागरूकता, आत्मीयता निर्माण होण्यास मदत होईल. तसेच मराठी भाषेमधील साहित्याची ओळख करून देता येईल असे प्रतिपादन केले. वाचन प्रेरणा दिनाच्या  निमित्ताने ग्रंथालयाच्या वतीने आयोजित केलेल्या ग्रंथप्रदर्शनाचा सर्व विद्यार्थ्यांनी व  शिक्षकांनी लाभ घेतला. या कार्यक्रमासाठी प्रा. डॉ.  जे. एल. चौधरी, प्रा. डॉ. जे. एम. साळवे प्रा. डॉ. ताटे-देशमुख, प्रा. डॉ. एस.पी. जाधव, प्रा. एन. एम. देवकाते, ग्रंथपाल रविकिरण मोरे, श्री. प्रवीण काळे यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मराठी विभागाचा विद्यार्थी सागर मदने यांनी केले व शुभांगी जाधव काशीकर  यांनी आभार मानले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test