सोमेश्वरनगर - विद्या प्रतिष्ठानचे सोमेश्वर इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनिअर कॉलेज सी.बी.एस.ई वाघळवाडी येथील इयत्ता ७ वी मध्ये शिकणाऱ्या तनुष्का शिवाजी भुजबळ हिने श्री दादासाहेब हरिभाऊ घाडगे पाटील विद्यालय नेवासा फाटा, अहमदनगर येथे घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय ज्यूदो स्पर्धेमध्ये पुणे विभागीय १४ वर्षाखालील ४४ किलो वजन गटातून प्रथम क्रमांक मिळवत सुवर्णपदकाची कमाई केली.
या स्पर्धेमध्ये सर्व जिल्ह्यांमधील खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. तनुष्काने ज्यूदोमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करत राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये स्थान मिळवले. शाळेचे मुख्याध्यापक सचिन पाठक यांनी तनुष्काचे अभिनंदन केले व तिच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. शाळेतील क्रीडा शिक्षक उर्मिला मचाले व रणजित देशमुख यांचे बहुमूल्य मार्गदर्शन तनुष्काला लाभले.