Crime New पोलिसांनी सापळा रचत परिसरातील अवैध्य दारू वाहतूक व विक्रीवर केली कारवाई
सुपा पोलीस स्टेशन हद्दीतील मोरगाव येथे आम्बी ते मोरगाव रोड वरती व सुपा येथे वढाणे ते सुपा रोड वरती अवैध बेकायदेशीर हातभट्टी दारू दुचाकी वरून वाहतूक होत असलेल्या मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे सुपा पोलिसांनी सापळा रचून अवैद्य दारू वाहतूक करणाऱ्या इसम नामे 1. रोबिन शैलेद राठोड 2. वंदना रोबीन राठोड, दोन्ही राहणार रेल्वे स्टेशन जवळ जेजुरी, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे 3. ओंकार शिवा राठोड 4. नकाशा ओंकार राठोड, दोन्ही राहणार राजेवाडी, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे व अवैधरित्या बेकायदेशीर हातभट्टी दारू विक्रेत्या 1. लिलाबाई बाबुराव गायकवाड, 2. सुनंदा मधुकर गायकवाड, दोन्ही राहणार मोरगाव, तालुका बारामती, जिल्हा पुणे यांच्यावरती महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात आली. सदर कारवाई मध्ये अवैध्य हातभट्टी दारू 110 लिटर व MH 12 VJ 5460 व MH 12 QC 7610 अश्या 02 मोटरसायकली जप्त करण्यात आल्या. सदर कारवाई मध्ये एकूण 131690/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
सदरची कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक माननीय श्री. अंकित गोयल साहेब, अप्पर पोलीस अधीक्षक, बारामती श्री. आनंद भोईटे साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी, बारामती विभाग गणेश इंगळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सुपा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील, सहा. फौजदार मोहरकर, ताकवणे,पोहवा राहुल भाग्यवंत, पोलीस नाईक धुमाळ, लोंढे, पोलीस शिपाई , साळुंखे,जैनक, दरेकर, महिला पोलीस अंमलदार मोहिते, धायगुडे व तावरे यांनी मिळून केली.