Type Here to Get Search Results !

सोमेश्वरनगर ! 'सोमेश्वर' येथील विद्या प्रतिष्ठान चा वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न.

सोमेश्वरनगर ! 'सोमेश्वर' येथील विद्या प्रतिष्ठान चा वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न.
विविध सांस्कृतिक कार्यक्रम तसेच "कृष्णलीला" चे चे सूंदर सादरीकरन...
 च्या ९०दशकातील सुपरहिट हिंदी गीतांचा समावेश .....

सोमेश्वरनगर - बारामती तालुक्यातील सोमेश्वरनगर येथील विद्या प्रतिष्ठानचे सोमेश्वर इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनिअर  कॉलेज सी.बी.एस.ई यांचा वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम दिनांक १५ व १६ डिसेंबर रोजी नुकताच पार पडला. शाळेने मागील काही वर्षांपासून हा स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम २ दिवस घेण्याची प्रथा सुरू केली व या दोन्ही दिवशी पालक व प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद या कार्यक्रमांना लाभला.
दिनांक १५ डिसेंबर रोजी इयत्ता नर्सरी ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी नातेसंबंधातील आपुलकी इतक्या उत्कृष्ट पद्धतीने सादर केली की, प्रेक्षकांची मने भारावून गेली. घरातील प्रत्येक नात्यांचा पदर अलवारपणे उघडण्यात आला आणि या भावना व्यक्त करण्यासाठी ९० च्या दशकातील सुपरहिट हिंदी गीतांचा समावेश करण्यात आला.या कार्यक्रमात फक्त कौटुंबिक नाते संबंध न दाखवता देशाशी असणारे मानवाचे नाते, शेतकऱ्यांचे आपल्या मातीशी असणारे इमान व तरुणपणात भरत जाणारी मित्र मित्रांमधील मैत्री यांचे ही उत्कृष्ट सादरीकरण करण्यात आले.
दिनांक १६ डिसेंबर रोजी इयत्ता ५ ते ११ पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी कृष्ण लीला या विषयावर सादरीकरण केले व प्रेक्षकांना भक्तिमय वातावरणात न्हाहून टाकले. कृष्णजन्माची पूर्व कथा ते कृष्णाच्या मार्गदर्शनाखाली झालेले महाभारत युद्ध व युधिष्ठीराचा राज्याभिषेक असे अनेक कृष्णलीलेचे पदर एका मागोमाग उलगडत गेले. या कार्यक्रमाचे मुख्य वैशिष्ट्य होते ते म्हणजे कृष्णलीला हा नाट्य नृत्याविष्कार क्षणाची ही विश्रांती न घेता सलग दोन तास चालला.
श्रीकृष्ण जीवनातील निवडक प्रसंग व त्याला अनुरूप गीतावरील नृत्याविष्कार हा या कार्यक्रमाचा मुख्य आकर्षण बिंदू होता. या कार्यक्रमात जवळजवळ ९०% विद्यार्थी सहभागी झाले होते .प्रत्येक विद्यार्थी आप- आपल्या नाट्यछटेतील भूमिका चपखळपणे साकारत होता. तसेच पडद्यामागे राहूनही अनेक विद्यार्थी कार्यक्रमाच्या विविध कामांमध्ये आपला सहभाग नोंदवताना दिसले.
मुलांना क्रमिक अभ्यासक्रम व्यतिरिक्त आपली संस्कृती तसेच प्रथा परंपरा याची ओळख करून देणे हा या  सादरीकरणामागचा मुख्य हेतू होता. भगवान श्रीकृष्ण व त्यांच्या संबंधित विविध गोष्टी मुलांनी यामधून आत्मसात केले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test