Type Here to Get Search Results !

शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचे प्रश्न मार्गी लावणार – टेकवडे

शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचे प्रश्न मार्गी लावणार – टेकवडे
वाल्हे(सिकंदर नदाफ)
पुरंदरसह हवेली तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचे विविध प्रश्न मार्गी लावणार असल्याची ग्वाही माजी आमदार तथा भाजप किसान मोर्चाचे जेष्ठ नेते अशोकभाऊ टेकवडे यांनी दिली.
पुरंदर तालुक्यातील विविध भागातील कित्येक शेतकरी बांधवांनी आपल्या जिव्हाळ्याच्या जमीन मोजणी संदर्भात सासवड येथील भूमी अभिलेख कार्यालयात रीतसर अर्ज दाखल केले होते.परंतु भूमी अभिलेख कार्यालयाकडून योग्य वेळेत मोजणी संदर्भातील कार्यवाही होत नसल्याने शेतकरी वर्गात तीव्र असंतोष निर्माण झाला होता.अशा परिस्थितीत शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेऊन भाजप किसान मोर्चा पुरंदरच्या वतीने भूमी अभिलेख विभागाचे उपअधीक्षक विकास गोफणे यांना निवेदन देण्यात आले.या दरम्यान माध्यमांशी संवाद साधताना टेकवडे हे बोलत होते.
ते पुढे म्हणाले भूमी अभिलेख कार्यालयाने शेतकऱ्यांची पिळवणूक त्वरित थांबवली पाहिजे तसेच कामकाजातही पारदर्शकता आणून सर्व कामे शासकीय कालावधीतच पूर्ण करावीत अन्यथा भूमी अभिलेख कार्यालयाच्या विरोधात वेळप्रसंगी आंदोलन करावे लागणार असल्याचा थेट इशारा देखील अशोकभाऊ टेकवडे यांनी दिला आहे.
या प्रसंगी भाजपचे बारामती लोकसभा मतदार संघाचे समन्वयक जालिंदर कामठे तालुकाध्यक्ष निलेश जगताप किसान मोर्चा पुरंदरचे अध्यक्ष संदीप देवकर युवा नेते अजिंक्य टेकवडे तसेच भानुकाका जगताप दिलीप कटके सचिन पठारे मयूर फडतरे विशाल कुदळे अथर्व भोंगळे रोहिदास कड आदी मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test