सोमेश्वरनगर ! मयुरी सवांत हिने पीएसआय पद संपादन केल्याबद्दल "भारतीय पत्रकार संघाच्या" वतीने सत्कार..
सोमेश्वरनगर - बारामती तालुक्यातील वाघळवाडी-सोमेश्वरनगर येथील मयुरी महादेव सावंत हिने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळवत पीएसआय पद मिळवले आहे. याबद्दल भारतीय पत्रकार संघाच्या वतीने करंजे येथील संपर्क कार्यालयात मयुरी सावंत हिचा सत्कार करण्यात आला या दरम्यान आयोजित कार्यक्रमात
सत्काराला प्रत्युत्तर देताना मयुरी सावंत म्हणाल्या बहुचर्चित असलेल्या भारतीय पत्रकार संघाने माझ्या यशाची दखल घेऊन मला मार्गदर्शन केल्या बद्दल मी पत्रकार संघाचे कायम आभारी राहील.
याप्रसंगी करंजे सरपंच भाऊसो हुंबरे, तंटामुक्ती अध्यक्ष प्रताप गायकवाड, पोलीस पाटील राजेंद्र सोनावणे तसेच प्रमुख उपस्थितीत भारतीय पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य कार्याअध्यक्ष सिकंदर नदाफ, पुणे जिल्ह्या अध्यक्ष तैनूर शेख होते तसेच सचिव काशिनाथ पिंगळे, बारामती तालुका अध्यक्ष विनोद गोलांडे , सचिव सुशीलकुमार अढागळे, संघटक महमद शेख,बारामती शोशल मीडिया प्रमुख मधुकर बनसोडे ,ऋषिकेश जगताप, हर्षद हुंबरे सह इतर पत्रकार बांधव उपस्थित होते.