Type Here to Get Search Results !

सोमेश्वरनगर ! विद्या प्रतिष्ठानच्या शौनकची सायकलींगच्या दोन स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी.

सोमेश्वरनगर ! विद्या प्रतिष्ठानच्या शौनकची सायकलींगच्या दोन स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी.
सोमेश्वरनगर - बारामती तालुक्यातील विद्या प्रतिष्ठानचे सोमेश्वर इंग्लिश मिडीयम स्कूल व ज्युनिअर कॉलेज सी.बी.एस.ई वाघळवाडी येथील इयत्ता ८ वी मध्ये शिकणाऱ्या शौनक संतोष महानवर याने १४ वर्षाखालील जिल्हास्तरीय शालेय सायकलींग टाईम ट्राईल मध्ये प्रथम क्रमांक मिळवला व सायकलिंग मास स्टार्ट या क्रीडा प्रकारात द्वितीय क्रमांक पटकावला.
सदर स्पर्धा दिनांक ०८/१२/२०२३रोजी क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आयोजित करण्यात आली होती. ही स्पर्धा श्री पळसनाथ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पळसदेव तालुका. इंदापूर या ठिकाणी घेण्यात आली. शाळेचे मुख्याध्यापक सचिन पाठक यांनी शौनकने मिळवलेल्या यशाबद्दल अभिनंदन केले.
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test