‘लोकशाही’चा गळा घोटणाऱ्या केंद्र सरकारच्या निषेधार्थ भारतीय पत्रकार संघ वतीने निवेदन.
सोमेश्वरनगर - देशभरात निःपक्षपाती, निर्भीडपणे पत्रकारिता करणाऱया वर्तमानपत्रांवर आणि वृत्तवाहिन्यांची केंद्र सरकारकडून गळचेपी सुरूच असून ‘लोकशाही मराठी’ या निर्भीड वृत्तवाहिनीवर माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने केंद्रीय माहिती आणि प्रसारण खात्याने Lok शाही मराठी वृत्तवाहिनी (Maharashtra) 9 जानेवारी सायंकाळी 6 वाजल्यापासून बंद व 30 दिवसांची बंदी घातली.माजी खाजदार किरीट सोमय्या यांचे प्रकरण लोकशाही या वृत्तवाहिनीने उजेडात आणले होते मात्र त्याचा सूड उगवण्यासाठी
माध्यमांवर बंदी आणणे हे लोकशाहीला घातक आहे. ‘लोकशाही’ वृत्तवाहिनीमागे भारतीय पत्रकार संघ हा ठामपणे उभा आहे. केंद्र सरकारच्या अशा गळपेची धोरणांचा भारतीय पत्रकार संघाच्या बारामती विभागातर्फ तीव्र निषेध व्यक्त केला असल्याचे निवेदन बारामती विभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांना निवेदन दिले तसेच वडगांव निंबाळकर पोलीस ठाणे येथे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन काळे वतीने करंजेपुल दुरक्षेत्र पोलीस निरीक्षक पांडुरंग कन्हेरे व पोलीस ठाणे अंमलदार पन्हाळे यांनी स्वीकारले.
यावेळी भारतीय पत्रकार संघ बारामती पदाधिकारी, सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.