करंजेपूल येथील निरा डावा कालव्या वरील पुलाचे काम कधी पूर्ण होणार... अपघाताला निमंत्रण देणारे पडलेत असंख्य खड्डे.
दररोज होतीय ऊस वाहतूक दार व प्रवाशांची कोंडी
सोमेश्वरनगर - बारामती तालुक्यातील करंजेपूल हद्दीतील निरा डावा कालवा रस्त्या वरील पुलाचे काम कित्येक महिने संत गतीने चाललेले आहे, या पुलावरून वाहतुकीची संख्या असंख्य असते, सोमेश्वर हे शिक्षणाचे संकुलन व परिसरासाठी मोठी बाजारपेठ आहे , मार्गाचा वापर बहुतांशी सोरटेवाडी, होळ, वडगाव निंबाळकर ,को-हाळे ,को-हाळे बुद्रुक ,पणदरे सह इतर ग्रामीण वाड्या वस्त्यावरील असंख्य विद्यार्थी येत असतात तसेच या करंजेपुलाचे काम व त्याचे डांबरीकरण रखडल्याने विद्यार्थी नागरिक प्रवाश्यांन सह कनॉल लगत असणाऱ्या व्यावसायिकांना होत आहे, येथे धुळीचे साम्राज्य इतके आहे की एखादे चार चाकी वाहन गेले तर दहा ते पंधरा मिनिटं या रस्त्यावर खडीची धूळकण मोठे प्रमाणात पसरत असते काही वेळ प्रवाश्यांना थांबावे लागते, तसेच सोमेश्वर साखर कारखाना चा यावर्षीचा गळीत हंगाम सुरु असल्याने ऊस बैलगाडी व ट्रॅक्टर वाहनांची संख्या अधिकची वाढलेली आहे, त्या मुळे या रस्त्यावरील वाहतुक दिवसभर चालू असते .
बुधवार दि २४ रोजी संध्याकाळ च्या सुमारास महिला दुचाकीवरून जात असताना पडलेल्या मोठ्या खड्यात गाडी अदळल्यामुळे जोरात पडली पाठीमागून कोणतेही मोठे वाहन नसल्याने कोणतीही दुर्घटना झाली नाही... परंतु पडलेले असंख्य खड्डे त्वरित बुजवले नाही तर मोठे अपघात होऊ शकतात...
शालेय विद्यार्थी प्रवाशी नागरिकांसह करंजेपुल येथील व्यवसायिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे तसेच संबंधित बांधकाम अधिकारी यांनी याची दखल घेत या पुलाचे उर्वरित काम व दोन्ही बाजूचे डांबरीकरण लवकरात लवकर काम पूर्णत्वाला न्यावे असे व्यावसाईक व नागरीकांनी बोलताना मागणी केली.
संबंधित अधिकाऱ्यांना फोन केला असता थोडे दिवसात काम चालू करण्यात येणार आहे असे त्यांनी बोलताना सांगितले