प्रणाली शिक्षण संस्थेच्या कार्यालयातील प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण आजी माजी सैनिक संघटना उपाध्यक्ष भगवान माळशिकारे यांचे हस्ते करण्यात आला
सोमेश्वरनगर - बारामती तालुक्यातील करंजे येथील असणाऱ्या प्रणाली शिक्षण संस्थेच्या कार्यालयातील प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण आजी माजी सैनिक संघटना उपाध्यक्ष भगवान माळशिकारे यांचे शुभ हस्ते ध्वजारोहण संपन्न झाला ...७५ व्या प्रजासत्ताक दिन हा आपल्या देशातील प्रमुख राष्ट्रीय सण आहे. संपूर्ण देशभरात २६ जानेवारी हा जोरदार साजरा केला जातो. प्रजासत्ताक दिन हा देशाच्या स्वातंत्र्य, अखंडतेचे प्रतीक आहे. शाळांमध्ये ,महाविद्यालय तसेच सहकार विविध संस्था तसेचशासकिय आणि खाजगी कार्यालयांमध्येही प्रजासत्ताक दिनाची जोरदार तयारी ही बघायला मिळत आहे.
या वेळी प्रणाली शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष बुवासाहेब हुंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रणाली शिक्षण संस्था उपाध्यक्ष व आजी माजी सैनिक संघटना कार्याध्यक्ष नितीन शेंडकर ,भारतीय पत्रकार संघ बारामती तालुकाध्यक्ष तथा संचालक विनोद गोलांडे,संचालक व करंजे राष्ट्रवादी अध्यक्ष संतोष
हुंबरे,जेष्ठ आजी माजी सैनिक संघटना सल्लागार राजाराम शेंडकर, करंजेतील माधव मोकाशी पाटील सह सोमेश्वर ग्रामस्थ मान्यवर उपस्थित होते