'सोमेश्वर ' येथे बारामती तालुका साखर कामगार सभा संपन्न.
सोमेश्वरनगर - बारामती तालुका साखर कामगार सभेची गेट मिटींग श्री सोमेश्वर कारखाना मेन गेटआतील टाईम ऑफीसचे समोर सोमवार दि.०८ रोजी पार पडली
यावेळी कैलास जगताप यांनी आपले मनोगत व्यक्त केले आपल्या मनोगतामध्ये जगताप यांनी सांगितले की, आपल्या कारखान्याचे सन्माननीय कार्यकारी संचालक यांना वसंतदादा शुगर इन्स्टिट्युट, मांजरी पुणे या संस्थेचा उत्कृष्ट कार्यकारी संचालक हा पुरस्कार मिळाला त्याबद्दल बारामती तालुका कामगार शुभेच्छा आणि सर्व अधिकारी कर्मचारी यांचे वतीने त्यांचे हार्दीक अभिनंदन तसेच आपल्या मागील
वेतनमंडळाची मुदत २०१९ मध्ये संपलेली असताना आदरणीय तात्यासाहेब काळे, अध्यक्ष महाराष्ट्र
राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळ यांनी संपूर्ण महाराष्ट्रभर फिरुन सर्व साखर कामगार संघटीत
करुन फार मोठा लढा राज्य शासनाविरुद्ध उभा करुन राज्यातील साखर कामगारांना १२ टक्के
वेतनवाढ मिळवून दिली. यामध्ये प्रत्येक कामगारांना ३ ते ४ हजारांपर्यंत घसघशीत पगारामध्ये वाढ
आली. आपल्या कारखान्याचे सन्माननीय चेअरमनसाहेब, सन्माननीय संचालक मंडळ व कार्यकारी संचालक यांनी तात्काळ लागू करुन त्याच्या फरकाची रक्कम देखील अदा केली. आत्ता मार्च २०२४ मध्ये या वेतनवाढीची मुदत संपत असून याबाबतचा मसुदा आदरणीय तात्यासाहेब काळे व त्यांचे सहकाऱ्यांनी तयार केलेला आहे.
यानंतर कारखान्याचे माजी कामगार संचालक बाळासाहेब गायकवाड यांनी सांगितले की,
नुकताच माळेगाव कारखान्याने बारामती कामगार सभेचा १२ टक्के वेतनवाढीचा करार केलेला असून
तात्यासाहेब काळे प्रणित बारामती तालुका साखर कामगार संघटनेबरोबर करार करुन ४०४ रोजंदारी
कामगारांना हंगामी/कायम एकत्रीत ऑर्डर दिलेल्या आहेत. तसेच तुकाराम जगताप यांनी औद्योगिक
न्यायालय, पुणे येथे बारामती तालुका कामगार संघटनेचा सरचिटणीस असलेबाबत दावा दाखल
केलेला होता त्या दाव्याचा निकाल त्यांचे विरोधात गेलेला असून सदर पदावरुन त्यांना कमी करणेत
आलेले आहे. याबाबतची कोर्ट ऑर्डर बाळासाहेब गायकवाड यांनी सर्व कामगारांना सभेमध्ये दाखविली.यानंतर कारखान्याचे माजी कामगार संचालक, बाळासाहेब काकडे यांनी आपल्या कारखान्याचे ३८५ रोजंदारी कामगार यांना हंगामी / कायम करणेबाबत मा.चेअरमनसाहेब, मा.संचालक मंडळ व कार्यकारी संचालक यांना पत्रव्यवहार केलेला असून त्यांचेसोबत याबाबत चर्चा सुरु आहे. लवकरच याबाबत चांगला निर्णय होणार आहे. आपल्या कारखान्याने जाहिर केलेला २१ टक्के बोनसपैंकी उर्वरीत ५ टक्के बोनस हा येत्या १२ तारखेला कामगारांच्या खात्यावर जमा करणार असल्याचे सांगितले.
यावेळी तानाजी सोरटे, संतोष भोसले, पतपेढीचे चेअरमन विशाल मगर, अजित शिंदे, धनंजय निकम,बाळासाहेब लकडे, विलास दानवले,.जय भोसले, राहुल खलाटे व युनियनचे सर्व पदाधिकारी, कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यानंतर बारामती तालुका साखर कामगार सभेचे उपाध्यक्ष धनंजय खोमणे यांनी सांगितले
की, काही दिवसांपुर्वीच दुसऱ्या संघटनेने घेतलेल्या मिटींगमध्ये त्यांनी जो दावा केला तो साफ खोटा
असून फक्त वर्षातून एकदाच कामगारांचा खोटा कळवळा असलेल्यांच्या पाठीमागे कामगारांनी जावू नये व त्यांच्या खोट्या भुलथापांना बळी पडू नये असे सांगितले. त्याचबरोबर कामगार संचालक घेणेबाबत अजितदादा पवारसोो, उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य, मा.चेअरमनसाहेब, मा.संचालक मंडळ व मा. कार्यकारी संचालक यांना पत्रव्यवहार केलेला असून याबाबत लवकरच निर्णय होणार आहे अशी अपेक्षा व्यक्त केली आणि सभा संपली असे जाहिर केले.