Type Here to Get Search Results !

सोमेश्वर परिसरातील गुणवंतांचा सत्कार करीत आजी माजी सैनिकांनी केला ७५ वा प्रजासत्ताक साजरा

सोमेश्वर परिसरातील  गुणवंतांचा सत्कार करीत आजी माजी सैनिकांनी केला ७५ वा प्रजासत्ताक साजरा
सोमेश्वरनगर - बारामती तालुक्यातील सोमेश्वरनगर येथील मुख्य शाखा असलेल्या बारामती तालुका आजी माजी सैनिक संघाद्वारे शुक्रवारी दि २६ जानेवारी रोजी असलेला प्रजासत्ताकदिन  उत्साहात साजरा करणेत आला.
     सोमेश्वर कारखाना अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप ,वीर नारी स्वातंत्र्य सेनानी श्रीमती हिराबाई दादासो हुंबरे , वीर नारी शीतल सूळ, इंडिया बुलियन ज्वेलर्स असोसिएशन चे प महाराष्ट्र अध्यक्ष किरण आळंदीकर , सिद्धीराज पतसंस्था अध्यक्ष तानाजी सोरटे वडगाव निंबाळकर अंकित करंजेपुल दुरक्षेत्र चे उपनिरीक्षक पांडुरंग कन्हेरे ,सर्व पोलीस  स्टाफ ,कारखान्याचे  माजी संचालक विशाल गायकवाड , विद्यमान संचालक ऋषिकेश गायकवाड  ,माजी सैनिक यांचे उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.
    ध्वजारोहण झालेनंतर ॲड.गणेश आळंदीकर यांनी संविधानाचे वाचन केले , सर्व उपस्थितांनी संविधानानुसार वागण्याची प्रतिज्ञा केली.
    संघटनेचे अध्यक्ष बाळासाहेब शेंडकर ,उपाध्यक्ष भगवान माळशिकरे यांनी उपस्थितांचे स्वागत केले.
     प्रस्ताविकामध्ये तक्रार निवारण कमिटी अध्यक्ष ॲड.गणेश आळंदीकर यांनी संघटनेने पाच वर्षात केलेल्या कामाचा आढावा घेतला.
     प्रमुख पाहुणे पुरुषोत्तम जगताप यांनी या संघटनेच्या प्रत्येक कार्याचे आपण साक्षीदार असून सुमारे १७५ तंटे कोर्टात ,पोलीस स्टेशनला न जाता मिटवले ही खूप समाधानाची बाब असून कोरोना काळात,पूरग्रस्तांना मदत,रक्तदान शिबीर,दरडग्रस्ताना मदत असे अतिशय भरीव काम या संघटनेने केल्याचे सांगून सैनिक निवृत्त झाला तरी कायम जवान असतो हे त्यांनी दाखवून दिले आहे असे म्हणाले.
     सराफ संघटनेचे अध्यक्ष किरण आळंदीकर यांनी मनोगतात सैनिक संघटनेचे व पत्रकारांचे कार्य कौतुकास्पद असल्याचे भाषणात सांगीतले.माजी संचालक विशाल गायकवाड यानी ही मनोगतात संघटनेच्या कार्याचे कौतुक केले.
    या प्रसंगी मान्यवरांचे हस्ते महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत झालेल्या परीक्षेत ग्रामीण भागातून उत्तीर्ण होवून स.सरकारी वकील पदी निवड झालेले ॲड. हेमंत होळकर,ॲड प्रांजली पांढरे,पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झालेली मयुरी महादेव  सावंत,ओंकार हेगडे,आय आय टी पोवई येथे पोस्ट डॉक्टरेट साठी निवड झालेबद्दल डॉ.मंगेश राजकुमार शेंडकर ,अपंग असताना देखील मंत्रालयीन क्लार्क महसूल विभागात उत्तीर्ण झालेले ज्ञानेश्वर पांडुरंग मदने,सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक शरद वेताळ, स.पो.उपनिरीक्षक पदी बढती झालेबद्दल संदीप मोकाशी व वीर नारी यांचा सत्कार करणेत आला. ॲड हेमंत होळकर व ॲड.प्रांजली पांढरे यांनी अभ्यासात सातत्य असलेस ग्रामीण भागातील विद्यार्थी देखील यशस्वी होवू शकतात असे मनोगतात सांगीतले.
 सैनिक संघटनेचे नितीन शेंडकर ,बाळासाहेब गायकवाड, किरण सोरटे  राजाराम शेंडकर , अशोक रासकर ,मदने सर ,युवराज चव्हाण गणेश शेंडकर लहू होळकर, रवींद्र कोरडे अन्य सदस्य उपस्थित होते सोमेश्वर स्पोर्टस अकॅडमी चे अध्यक्ष भाऊसाहेब लकडे, पत्रकार महेश जगताप,विनोद गोलांडे  यांचेसह परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते.   कुमारी कृतिका किरण सोरटे यांनी भक्ती गीत गाण्यावर नृत्य केले.आभार अध्यक्ष बाळासाहेब शेंडकर यांनी मानले .

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test