रोजगार व स्वयंरोजगार सेलच्या तालुकाध्यक्ष पदी राजेंद्र त्रिंबक साळुंके.
बारामती : वडगांव निंबाळकर येथील सामाजिक कार्यकर्तें राजेंद्र त्रिंबक साळुंके यांची राष्ट्रवादी कॉग्रेस रोजगार स्वयंरोजगार सेल (अजित पवार गट) तालुकाध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात आली. मुंबई येथे झालेल्या कार्यक्रमात साळुंके यांना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते निवडीचे पत्र देण्यात आले.
याप्रसंगी राष्ट्रवादी कॉँग्रेस प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, राष्ट्वादी रोजगार स्वयंरोजगार सेल राज्याच्या प्रमुख मेघा पवार, यांच्यासह पुणे जिल्ह्यातील राष्ट्रवादी पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पक्षाच्या वतीने दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे सांभाळली जाईल, असे साळुंके यांनी निवडीनंतर बोलताना सांगितले.