Type Here to Get Search Results !

मेडदला एकाच दुकानात दुसऱ्यांदा चोरी माळेगाव पोलीस ठाण्याच्या कारभारावर प्रश्नचिन्ह?

मेडदला एकाच दुकानात दुसऱ्यांदा चोरी माळेगाव पोलीस ठाण्याच्या कारभारावर प्रश्नचिन्ह?

सोमेश्वरनगर  - बारामती शहराजवळील मेडद येथे गेल्या गतपंधरवड्यात चोरट्यांनी तीन दुकाने फोडली होती. या घटनेचा तपास लागण्यापूर्वीच शनिवारी (दि. ६) पुन्हा त्याच दुकानात चोरी झाली आहे. यामुळे आता माळेगाव पोलीस ठाण्याच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
        बारामती-मोरगाव रस्त्यालगत मेडद येथे तीन दुकाने आहेत. ही तिन्ही दुकाने गेल्या पंधरवड्यापूर्वी फोडण्यात आली होती. त्यावेळी चोरट्यांनी तिन्ही दुकानातील रोख रकमेसह साहित्य लंपास केले होते.  त्यावेळी ३५ हजार रुपयांचा मुद्द्यामाल चोरीला झाला होता. याप्रकरणी माळेगाव पोलिस ठाण्यात अज्ञातांविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पंधरा दिवसांपूर्वी चोरट्यांनी गाळ्याच्या पाठीमागील बाजूचे पत्रे उचकटून आत मध्ये प्रवेश केला होता. शनिवारी मात्र मध्यरात्री पुढील बाजूचे शटर कशाच्या तरी साह्याने उचकुटून आत मध्ये प्रवेश करून आईस्क्रीमचे बॉक्स सिगारेट व बिलाची फाईल असा एकूण आठ हजार रुपयाचा मुद्देमाल चोरून नेला आहे.
याप्रकरणी माधव श्रीहरी झगडे ( रा. मेडद ता.बारामती ) यांनी माळेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.  मागील वेळीस एसपी आईस्क्रीम पार्लर आणि कोल्डिक्स, हसनैन एंटरप्रायझेस आणि रॉयल स्नॅक्स या तीन दुकानांमधून रोख रक्कमेसह साहित्याची चोरी झाली होती.  यावेळी घटनेत एसपी आईस्क्रीम पार्लर अँड कोल्ड्रिंक्स दुकानातून चोरट्याने आईस्क्रीम बॉक्स, सिगारेट बिलाची फाईल असे साहित्य चोरून नेले आहे. पंधरा दिवसात दुसऱ्यांदा तीच दुकाने परत फोडले गेल्याने पोलिसाच्या कार्यक्षमते विषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. यापूर्वीचा तपास अद्याप लागलेला नसून यामुळे व्यवसायिकामध्ये भीतीचे वातावरण असल्याचे येथील व्यावसायिक माधव झगडे यांनी सांगितले. दरम्याने या प्रकरणी माळेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केली असून या गुन्ह्याचा तपास अमलदार गाढवे करीत आहेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test