Type Here to Get Search Results !

स्तुत्य उपक्रम ! वाकी येथील गाडे कुटुंबियांनी सुपा येथील प्राजक्ता मतिमंद शाळेस धनादेश देत वडिलांचे 'प्रथम पुण्यस्मरण' केले साजरे....या सामाजिक उपक्रमाबद्दल गाडे कुटुंबीयांचे परिसरातून कौतुक

स्तुत्य उपक्रम ! वाकी येथील गाडे  कुटुंबियांनी सुपा येथील प्राजक्ता मतिमंद  शाळेस धनादेश देत वडिलांचे 'प्रथम पुण्यस्मरण' केले साजरे

या सामाजिक उपक्रमाबद्दल गाडे कुटुंबीयांचे परिसरातून कौतुक
फोटो ओळ - धनादेश सुपूर्त करताना उपस्थित मान्यवर ग्रामस्थ

बारामती - बारामती तालुक्यातील पांढरवस्ती-वाकी  येथील कै,बबन गंगाराम गाडे यांच्या प्रथम पुण्यस्मरणार्थ निमित्त  मुलगा दत्तात्रय गाडे व नवनाथ गाडे  कुटुंबियांनी सामाजिक बांधिलकी जपत  साध्या पद्धतीने भजनाचा कार्यक्रम आयोजित करून प्रथम पुण्यस्मरण साजरे केले. यावेळी भजनी मंडळ वाकी चोपडज अंजनगाव यांचा भजनाचा कार्यक्रम झाला.
 इतर आवश्यक खर्च टाळत सुपा येथील प्राजक्ता मतिमंद निवासी शाळेला ४१००० (एकेचाळीस) हजार रुपयाचा धनादेश शाळेचे प्रमुख जयराम सुपेकर यांचेकडे सुपुर्द केला.
 तसेच उपस्थित मान्यवर ग्रामस्थ व पावणे यांनी देखील या शाळेला मदत म्हणून आणखी ११००० हजार रुपये शाळेला मदत दिली.
    सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी सर्वांनीच  अनावश्यक खर्च टाळत वाढदिवस ,लग्नाचे वाढदिवस व आई वडिलांचे प्रथम  प्रथम पुण्यस्मरण यावेळी असे उपक्रम  राबवावे असे नम्र आवाहन आदर्श घ्यावा असे विचार दिलीप गाडे गुरूजी यांनी याप्रसंगी व्यक्त केले.
तसेच मतिमंद शाळेचे प्रमुख सुपेकर बोलताना 
शाळेत मंतिमंद मुले मुली पटसंख्या २५ आहे.या मुलांसाठीचा सर्व खर्च समाजातील मिळणाऱ्या मदतीतून केला जातो.शासनाकडून कुठलेही अनुदान मिळत नाही तसेच शाळेसाठी मतिमंद शाळेसाठी दिलेल्या धनादेशाबद्दल गाडे कुटुंबीयांचे त्यांनी आभार मानले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test