स्तुत्य उपक्रम ! कै.चांगदेव केरबा लकडे यांच्या प्रथम पुण्यस्मरण निमित्त माऊली अनाथ आश्रमास धनादेश सुपूर्त
सोमेश्वरनगर - बारामती तालुक्यातील खंडोबाची वाडी येथील कै.चांगदेव केरबा लकडे यांचे प्रथम पुण्यस्मरण निमित्त बालकिर्तनकार हभप आर्यन महाराज गोरड नसरापूर भोर यांचे किर्तन व फुलांचा कार्यक्रम तसेच महाप्रसाद आयोजन केले होते
तसेच आपण समाज्याचे काही तरी देणे लागतो या अनुषंगाने कै. चांगदेव लकडे यांचे चिरंजीव बापुराव लकडे व अमोल लकडे व समस्त लकडे कुटुंबीय यांच्या हस्ते माऊली अनाथ आश्रम नसरापूर भोर जिल्हा पुणे यांना पाच हजार रुपये धनादेश देत एक स्तुत्य उपक्रम राबविला ,या उपक्रमाचे उपस्थित मान्यवरांनी कौतुक केले .