Type Here to Get Search Results !

Crime news . गाळमाती उपसण्याचे कारणावरून बेदम मारहान;१३ आरोपीस दोन महिण्याच्या कारावासाची शिक्षा ; कानाडवाडी येथील घटना

गाळमाती उपसण्याचे कारणावरून बेदम मारहान;१३ आरोपीस दोन महिण्याच्या कारावासाची शिक्षा ; कानाडवाडी येथील घटना
सोमेश्वरनगर -  गाळमाती उपसण्याचे कारणावरून फिर्यादी व त्यांचे आई वडीलांस बेदम मारहान करणाऱ्या एकुन १३
आरोपीस दोन महिण्याच्या कारावासाची शिक्षा व प्रत्येक आरोपीस १०,०००/- रु दंड  अशी एकुन १,३०,०००/- रु दंड केला आहे.
मिळालेल्या महितीनुसार वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन हददीतील मौजे कानाडवाडी गावचे हददीत दि.२०/०४/२०१२ रोजी फिर्यादी नामे प्रकाश तुळशीराम भगत व त्यांचे आई-वडील व इतर जखमी साक्षिदार यांना गाळमाती उपसण्याच्या कारणावरून आरोपी नामे १) दिगंबर गुलाब मासाळ २) शरद गुलाब मासाळ ३) पिंटु उर्फ प्रेमचंद दिगंबर मासाळ ४) वैभव शरद मासाळ ५) कुंडलिक बापु माने (मयत) ६) जालिंदर कुंडलिक माने ७) गेना बापू माने ८) दत्तात्रय संपत पडळकर ९) मंगल दिगंबर मासाळ १०) आनंदी शरद मासाळ ११) राणी जालिंदर माने १२) छ्बुताई कुंडलिक माने १३) कमल बबन माने १४) रतन संपत पडळकर वरिल सर्व रा मोराळवाडी ता बारामती जि पुणे यांनी आपापसात संगणमत करून बेकायदा गर्दी जमाव जमवुन हातात लोखंडी पाईप, दांडके, काठया, व
केबल वायर अशी हत्यारे घेवुन वरिल लोकांना डोक्यात मारहान करून गंभीर दुखापत केली आहे. म्हणुन वरि १४ आरोपीविरूध्द वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन गु.रं. नं. ५६/२०१२ भा. द. वि. कलम १४३, १४७, १४८.१४९, ३२३, ३२४, ३२५, ३२६, ५०४, ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्हयाचा तत्कालिन पोलीस उपनिरीक्षक जी. बी. पांढरे यांनी तपास पुर्ण करून मे बारामती कोर्टात दोषारोपपत्र दाखल केले
होते. सदर गुन्हयात आरोपी विरूध्द गुन्हा शाबीत करणेसाठी सरकारी वकील श्री नितीन प्रकाश होळकुदे यांनी एकुन आठ साक्षिदार तपासले व मा. सर्वोच्च न्यायालय, दिल्ली, व मा. उच्च न्यायालयाचे विविध न्यायनिवाडे दाखल करून वरिल सर्व १३ आरोपींविरूध्द सबळ व भरपुर पुरावा असल्याने अंतिम युक्तीवाद करून सर्व आरोपीस प्रत्येकी २ महिन्याचा कारावासाची शिक्षा व प्रत्येक आरोपीस १०,०००/- रू दंड केला आहे व सर्व आरोपींस मे. कोर्टानें भा.द.वि. कलम ३२४, ३२३, १४३, १४७, १४८, प्रमाणे शिक्षा सुनावली आहे. वरिल सर्व १३ आरोपीस सदर शिक्षा ही बारामती येथील में प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी सो, श्रीमती पी. ए आपटे यांनी सुनावली असुन, सरकारी वकील श्री नितीन प्रकाश होळकुदे यांना सदर केस कामी कोर्ट पैरवी म्हणुन महीला पोलीस शिपाई एम. के. भोईटे ब.नं. २६४७ यांनी सहकार्य केले आहे.
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test