Type Here to Get Search Results !

गडदरवाडी येथे उस पिकाचे शेतात एक पुरुष जातीचा आढळला मृतदेह...फोटोमधील बेवारस मयतास कोण ओळखत असल्यास वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन संपर्क साधावा-सचिन काळे

गडदरवाडी येथे उस पिकाचे शेतात एक पुरुष जातीचा आढळला मृतदेह...
फोटोमधील बेवारस मयतास कोण ओळखत असल्यास वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन संपर्क साधावा-सचिन काळे

सोमेश्वरनगर प्रतिनिधी
वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन हददीतील नामदेव महादेव लकडे यांचे मौजे गरदडवाडी ता. बारामती जि.पुणे येथील उसाचे शेतात आढळला एक पुरुष जातीचा बेवारस काल दिनांक ११/२/२०२४ रोजी सायंकाळी ५:३० वा.चे सुमारास वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन अंकीत करजेपुल पोलीस दुरक्षेत्र हददीतील शेतकरी नामदेव महादेव लकडे यांना त्यांचे मौजे गडदरवाडी ता. बारामती जि.पुणे येथील शेतजमीन गट नं ३९९ मधील उभे उस पिकाचे शेतात एक पुरुष जातीचे वय अंदाजे ५० ते ५५ वर्षे वयाचा मृतदेह दिसुन आल्याने त्यांनी त्याबाबत वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन येथे दिले खबरीवरुन अकस्मात मयत रजि नं १०/२०२४ सी.आर.पी.सी १७४ प्रमाणे मयत दाखल झाले असुन सदर
मयताचा तपास वडगाव निबाळकर पोलीस स्टेशनचे सहा पोलीस निरीक्षक सचिन काळे यांचे
मार्गदर्शनाखाली पी.एस.आय. पी.के.कन्हेरे हे करीत आहेत. सदरचा बेवारस मृतदेहाची ओळखपटे पर्यंत तो अॅम्ब्युलन्सने सिल्व्हर ज्युबली हॉस्पीटल बारामती येथे पाठवुन फ्रिजरमध्ये ठेवण्यात आलेला आहे. सदरचे बेवारस पुरुष मयताचे वय अंदाजे ५० ते ५५ वर्षे वयाचे असुन त्याचे चेहरा काळपट
असुन, डोकीस काळे पांढरे केस आहेत, तसेच गालावर पांढरी दाढी असुन, शरीर सडपातळ आहे. त्याचे अंगात नेसणीस एक राखाडी रंगाची बरमोडा आहे. तरी वडगाव निबाळकर पोलीसांकडुन सदर मयताचे ओळख पटविणेकामी आवाहण करण्यात येते की, वरील वर्णनाचे, सोबतचे फोटोमधील बेवारस मयतास कोण ओळखत असल्यास वडगाव निबाळकर पोलीस स्टेशनचे पी.एस.आय.कन्हेरे मो.नं. ९४२००१६३८९ यावर तसेच वडगाव
निंबाळकर पोलीस स्टेशन फोन क्रमांक ०२११२/२७२१३३ यावर संपर्क होणेस विनंती आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test