निखिल वागळे यांच्यावरील हल्ल्याचा बारामतीत निषेध.
बारामती - जेष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा भारतीय पत्रकार संघाच्या बारामती विभागातर्फे निषेध व्यक्त करण्यात आला आहे
शुक्रवार दि.९ फेब्रुवारी रोजी पुरोगामी संघटनांतर्फे आयोजित करण्यात आलेल्या “निर्भय बनो” सभेला जाताना जेष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्या गाडीवर भाजपच्या कार्यकर्त्यांनी दगड लाठ्या काठ्या हॉकी स्टिक तसेच लोखंडी रॉडच्या साह्याने प्राणघातक हल्ला करीत त्यांच्यावर शाई फेक केली होती.या घटनेच्या पार्श्वभूमीवर भारतीय पत्रकार संघाच्या बारामती विभागाकडून नायब तहसीलदार सविता शिंदे यांना निवेदन देऊन हल्लेखोरांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे
याप्रसंगी भारतीय पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष तैनूर शेख बारामती तालुकाध्यक्ष विनोद गोलांडे सचिव सुशीलकुमार अडागळे तसेच फिरोज भालदार, अजय पिसाळ, अभिजीत ननवरे यांसह आदी मान्यवर उपस्थित होते