आजी माजी सैनिक संघटना वतीने "छत्रपती शिवाजी महाराज" यांची जयंती उत्साहात साजरी.
बारामती/सोमेश्वरनगर -विनोद गोलांडे
अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात सोमवारी दि १९ रोजी सोमेश्वरनगर येथील आजी माजी सैनिक संघ कार्यालय वतीने साजरी करण्यात आली. "छत्रपती शिवाजी महाराज" यांच्या पुतळ्यास आजी माजी सैनिक संघटना पदाधिकारी यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी आजी माजी सैनिक संघटना अध्यक्ष बाळासाहेब शेंडकर, सोमेश्वर स्पोर्ट अकॅडमी अध्यक्ष भाऊसो लकडे, ज्येष्ठ राजाराम तात्या शेंडकर, कार्याध्यक्ष नितीन शेंडकर, सेवानिवृत्त पी एस आय प्रकाश हुंबरे ,पत्रकार विनोद गोलांडे ,अधिक शेंडकरसह मान्यवर उपस्थित होते.