Type Here to Get Search Results !

वनस्पती तज्ञ, पर्यावरणप्रेमी आबा रणवरे यांना राज्यस्तरीय अनमोल टी.एम. जी कार्यगौरव पुरस्कार

वनस्पती तज्ञ, पर्यावरणप्रेमी आबा रणवरे यांना राज्यस्तरीय अनमोल टी.एम. जी कार्यगौरव पुरस्कार
मुंबई : लोकगौरव राष्ट्रीय एकात्मता परिषद व टी.एम.जी.क्रिएशन्सच्या विद्यमाने ५ व्या वर्धापनदिना निमित्त मुंबई मराठी पत्रकार भवन येथे ४ फेब्रुवारी रोजी आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्यात जुईनगर येथील वनस्पतीतज्ञ व पर्यावरणप्रेमी तसेच औषधी वनस्पतींचे उपचारक आबा रणवरे राज्यस्तरीय अनमोल टी.एम. जी कार्यगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. सदर कार्यक्रमात पत्रकारिता सामाजिक, सांस्कृतिक, कला, क्रीडा, आरोग्य सेवा, शिक्षण अशा विविध क्षेत्रात लक्षवेधी कामगिरी करणाऱ्या अनेक व्यक्तीमत्वांनाही फेटा, आकर्षक सन्मानचिन्ह, मेडल व सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले.
   यावेळी विचारमंचावर माजी माहिती व जनसंपर्क संचालक देवेंद्र भुजबळ, ज्येष्ठ अभिनेते जयवंत वाडकर, 'तारक मेहता का उल्टा चश्मा'फेम अभिनेते जाकिर खान, माजी पोलीस अधिकारी सुनिता नाशिककर, डॉ. जालिंदर महाडिक, अभिनेत्री अमृता उत्तरवार, रेड प्लॅनेटच्या संचालिका सिम्मी शेख, आयकॉन फाऊंडेशनचे अध्यक्ष मोहन बडगुजर आदि मान्यवर उपस्थित होते. आबा रणवरे यांनी बेस्टमध्ये दीर्घकाळ चालक म्हणून सेवा बजावत असतानाच एक छंद म्हणून औषधी वनस्पती, निसर्गोपचाराच्या माध्यमातून अनेकांच्या जुनाट दुखण्यांवर  प्रभावीरित्या उपचार केले आहेत. त्याबद्दल त्यांना विविध वृत्तपत्रे, वृत्तवाहिन्या यांनी नावाजले असून अनेक नामांकित संस्था, संघटना, मंडळे यांनी मानाचे पु्‌रस्कात देऊन त्यांच्या कार्याची उचित दखल घेतली आहे.  सदर लोकगौरव राष्ट्रीय एकात्मता पुरस्कार वितरण सोहळ्याच्या  यशस्वितेसाठी लोकगौरव राष्ट्रीय एकात्मता परिषदेचे संस्थापक एन. डी. खान व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी प्रदीर्घ मेहनत घेतली.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test