बारामती नगर परिषद समोर भारतीय युवा पँथर संघटना करणार आंदोलन
बारामती : बारामती नगर परिषदेसमोर भारतीय युवा पँथर संघटना करणार आंदोलन करणार आहे.त्यामधील प्रमुख मागण्या
१) पथविक्रेते यांच्या कडून निनावे पावती देऊन कर वसूल करणारे कॉन्ट्रॅक्ट/ठेका बंद करा.दिलेल्या पावत्या व वसूल केलेल्या पैशांची चौकशी करा. ठेकेदाराला काळ्या यादीत टाका.
२) सार्वजनिक शौचालय स्वच्छतेसाठी ठेका/कॉन्ट्रॅक्ट देताना दिवसातून दोन वेळा दोन वेळा स्वच्छता करण्याची अट आहे तसेच परिसर स्वच्छ करणेची अट आहे .त्याप्रमाणे काम केले जात आहे का याची चौकशी करा.चौकशी पूर्ण होईपर्यंत देयक देऊ नये.सदर काम नियमानुसार केले नसल्यास ठेकेदारावर कारवाई करा.
३)सिद्धार्थ नगर येथील पाण्याचा हातपंप दुरुस्त करून सांडपाण्याची व्यवस्था करा.
४)प्रभाग क्रमांक १४ मधील अनंत नगर,सिद्धार्थ नगर येथील समाजमंदिर व इतर सार्वजनिक पाण्याच्या बोअरला पाण्याची टाकी
बसविनेबाबत.
५)बारामती शहरातील पथदिवे दुरुस्त करा.
६) बारामती शहरातील विकास कामांच्या स्वच्छतेसाठी स्वतंत्र व्यवस्था करा.
७)शासकीय योजनांची माहिती देण्यासाठी शिबिरे आयोजित करा.
सदर विषयाबाबत बारामती नगर परिषदेचे मुख्याधिकारी महेश रोकडे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी भारतीय युवा पँथर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गौरव अहिवळे,संपर्क प्रमुख शुभम गायकवाड ,पुणे जिल्हा अध्यक्ष असलम वस्ताद शेख,बारामती शहर अध्यक्ष निखिलभाई खरात,बारामती शहर संघटक समीर खान,सदस्य विनोद सवाणे,संतोष भोसले उपस्थित होते.सदर मागण्याची पूर्तता केली नाही तर दिनांक १२/०२/२०२४ पासून बारामती नगर परिषद समोर भारतीय युवा पँथर संघटना बेमुदत धरणे आंदोलन करणार आहे.अशी माहिती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गौरव अहिवळे यांनी दिली.