बारामती ! सबसिडी म्हणजे तुमच्या व्यवसायासाठी बूस्टर डोस - नितीन बेंद्रे
बारामती प्रतिनिधी
बारामती बिजनेस चौक च्या माध्यमातून बारामती आणि परिसरातील उद्योजकांसाठी उद्योग संधी व शासकीय योजना या विषयावर श्री नितीन बेंद्रे प्रकल्प समन्वयक उद्योजकता विकास केंद्र पुणे यांचे मार्गदर्शन ठेवण्यात आले होते. हा कार्यक्रम फ्युजन इन्फिनिटी सोल्युशन पेन्सिल चौक बारामती येथे घेण्यात आला. या कार्यक्रमांमध्ये दौंड, इंदापूर, भिगवण, कुरकुंभ, फलटण, बारामती या परिसरातील 87 व्यवसायिकांनी सहभाग घेतला आहे. यावेळी बोलताना नितीन बेंद्रे यांनी लघुउद्योजकांपासून मोठ्या उद्योजकतेपर्यंत कसे पोहोचावे व यासाठी लागणारे भांडवल कोणत्या योजनेतून उभे करावे, कोणत्या सबसिडीस आपण पात्र होऊ शकता आणि त्याचबरोबर सरकारी योजना व बँक कशाप्रकारे काम करतात याविषयी सविस्तर इत्तंबूत माहिती दिली. या संधीचा फायदा घेऊन भविष्यात उद्योजक घडावे या संकल्पनेने बीबीसी अर्थात बारामती बिजनेस चौक कार्य करत आहे असेही आयोजकांच्या वेळी वतीने सांगण्यात आले.