Type Here to Get Search Results !

सोमेश्वरच्या सभासद शेतकऱ्यांना ऊस जळीत न करणेचे आवाहन.


सोमेश्वरच्या सभासद शेतकऱ्यांना ऊस जळीत न करणेचे आवाहन.
सोमेश्वरनगर प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने आजअखेर १२१ दिवसांमध्ये कारखान्याची दैनंदिन गाळप क्षमता ७५०० मे.टन एवढी असताना सरासरी प्रतिदिन ९००० मे. टनाने गाळप करीत एकूण १०,८४,२३३ मे.टन ऊसाचे गाळप केले असून यामधून जिल्ह्यामध्ये सर्वोच्च सरासरी ११.७४ टक्के साखर उतारा राखत १२,६७,६५० क्विंटल साखर उत्पादन घेतले आहे. कारखान्याकडे मुबलक ऊस तोडणी वाहतूक यंत्रणा उपलब्ध असून, ऊस तोडणी वाहतूकीचे योग्य व चांगल्या प्रकारचे नियोजन केल्यामुळे संपुर्ण पुणे जिल्ह्यात कारखान्याने क्रमांक एकचा साखर उतारा राखत आजअखेरचे गाळप पुर्ण केले आहे.हे गाळप करीत असताना कारखान्याने कार्यक्षेत्रातील आडसाली ७,०६,०१५ मे.टन, पुर्व हंगामी १,१३,३९५ मे.टन, सुरु १३,९९५ मे.टन, खोडवा ६५,४२६ मे. टनाचे गाळप केले असल्याची माहिती श्रीसोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी दिली. जगताप यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात पुढे म्हंटले आहे की, कारखान्याकडे तोडणी वाहतूक यंत्रणेने शेतकरी सभासदांचा ऊस जळीत करुन आणलेस तोडणी वाहतूक यंत्रणेच्या बीलातून २०० रुपयेप्र ति टन कपात करणेचा निर्णय संचालक मंडळाने घेतला असून त्यासोबतच जर सभासद शेतकऱ्यांच्या
सहमतीने ऊस जळीत करुन कारखान्याकडे गाळप करणेचा निर्णय घेतलेस शेतकऱ्यांच्या ऊस बीलातून
प्रति मे.टन रु.५०/- प्रमाणे कपात करणेचा निर्णयही घेणेत आले असल्याची माहिती श्री. जगताप यांनी
दिली. त्यामुळे कपातीचे नुकसान टाळणेसाठी सभासद शेतकऱ्यांनी आपला चांगला ऊस जळीत करणेस परवानगी देवू नये. कारखान्याकडे नोंद केलेल्या सभासदांच्या व बिगर सभासदांच्या संपुर्ण ऊसाचे गाळप करण्यासाठी कारखाना कटीबद्ध असून हा ऊस गाळप करण्याची जबाबदारी कारखान्याची आहे. जगताप पुढे म्हणाले की, सध्या ऊस तोडणी करत असताना ऊस तोड यंत्रणेकडून व
मजूरांकडून पैशाची मागणी केली जात असल्याच्या तक्रारी कारखाना प्रशासनाकडे येत असून याबाबत
पैशाची मागणी झालेस त्याबाबतची लेखी स्वरुपात सभासद शेतकऱ्यांनी कारखान्यास कळवावे याची
चौकशी करुन ऊस तोड यंत्रणेने घेतलेल्या पैशाची कपात त्यांचे ऊस तोडणी वाहतूक बीलातून कपात
करुन सभासद शेतकऱ्यांना परत केले जातील.
श्री.जगताप पुढे म्हणाले की, कारखान्याने जाहिर केलेल्या धोरणानुसार पुढील हंगामाकरीता सुरु
लागणीस रु.१५०/- प्र.टन व खोडव्यासाठी रु.१५०/- प्र. टन अनुदान देणेचा निर्णय संचालक मंडळाने
असून ही रक्कम पुढील हंगामाच्या तुटणाऱ्या ऊसासाठी लागू असेल जगताप पुढे म्हणाले की, आपल्या कारखान्याची बहुतांश शेती ज्या निरा डावा कालव्यावर अवलंबून असते त्या निरा डावा कालव्याचे आवर्तन कारखान्याचे मार्गदर्शक व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या योग्य नियोजनामुळे व सहकार्यामुळे माहे जून अखेरपर्यंत सुरु राहणार असल्याने शेतकऱ्यांनी सुरुच्या लागणी व तुटणाऱ्या ऊसाचे खोडवे राखावेत असे आवाहन श्री. जगताप यांनी केले. श्री.जगताप पुढे म्हणाले की, चालू हंगामामध्ये १ मार्चपासून ते हंगाम संपेपर्यंत तुटणाऱ्या ऊसास प्र.मे.टन रु.१५०/- प्रोत्साहनपर अनुदान देणेचा निर्णय संचालक मंडळाने घेतलेला असून त्यामुळे मार्चपासून तुटणाऱ्या ऊसास प्र.मे. टन रु. ३,१५०/- असे एकरकमी ऊस बील सभासद शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करणेत येणार आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test