स्तुत्य उपक्रम ! एक हजार कामगार कुटुंबीयांना गृह उपयोगी भांडी संच वाटप कार्यक्रम संपन्न.
सोमेश्वरनगर - महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळ योजने अंतर्गत १००० कामगार कुटुंबीयांना प्रत्येकी ९७०० रुपये किमतीचे गृह उपयोगी भांडी संच वाटप कार्यक्रम शुक्रवारी १५ मार्च रोजी सोमेश्वर पॅलेस वाघळवाडी येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वप्निलभैय्या शहाजीराव जगताप यांच्या विशेष प्रयत्नातून हा कार्यक्रम राबवण्यात आला.कार्यक्रमाचे अध्यक्ष सतिशभैय्या काकडे देशमुख होते तर अध्यक्षीय भाषणात शिवसेनेचे तालुकाध्यक्ष म्हणून स्वप्निल जगताप यांचे काम खरंच कौतुकास्पद आहे असे गोरगरीब जनतेतून आवाज व कानावर येत आहे याचेही समाधान काकडे यांनी व्यक्त केले तर त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या तर सुनेत्राताई पवार आणि संजयजी मशिलकर(शिवसेना सचिव महाराष्ट्र राज्य)यांच्या शुभहस्ते हा कार्यक्रम पार पडला कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून बारामती टेक्स्टाईल च्या अध्यक्ष सुनीता वहिनी पवार ह्या होत्या राबवण्यात बोलताना पुढे म्हणाल्या की राबवण्यात आलेला हा स्तुत्य उपक्रमाबद्दल आहे त्याबद्दल स्वप्निल जगताप व सर्व आयोजकांचे आभार मानले व त्यांच्या पुढील कार्यालया शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी अँड.गितांजलीताई ढोणे,सौ.सिमाताई कल्याणकर,राजवर्धनदादा शिंदे,दिग्विजयभैय्या जगताप,सौ.गितांजलीताई जगताप,पुजा गायकवाड,अँड.हेमंड गायकवाड,भारती सोरटे सह शंभुनाना जगताप,संकेत जगताप,रविदादा जगताप,सुरज जगताप,राजेंद्र शेळके आदी मान्यवर उपस्थित होते.