Type Here to Get Search Results !

...यामुळे होळी सण साजरा करतात.

...यामुळे होळी सण साजरा करतात.
●विशेष प्रतिनिधी●
हिंदू धर्मात तसे पाहिले गेले तर प्रत्येक सणाची कहाणी आहे तसेच, होळी साजरी करण्या मागे देखील प्राचीन माहिती नुसार एक प्राचीन इतिहास आहे. हिरण्यकश्यपू नावाचा एक राजा होता जो स्वतःला खूप चतुर बलवान समजायचा. स्वतःच्या अहंकारामुळे तो देवतांची घृणा करायचा तसेच त्याला देवांचा देव भगवान विष्णूचे नाव ऐकणे देखील पसंत करत नव्हते. परंतु त्याचा पुत्र "प्रल्हाद"  हा एक भगवान विष्णूची पुज्या करत आणि परम भक्त होता. ही भक्ती  हिरण्यकश्यपूला  पसंत नसल्याने वेगवेगळ्या प्रकारे त्याला घाबरवण्याचा प्रयत्न करत असे जेणे करून पुत्र प्रल्हाद  भगवान विष्णूची उपासना करणे सोडून देईल. परंतु भक्त प्रल्हाद त्यांना न डगमगता त्याच्या भगवान विष्णूच्या भक्तीत लीन होत असे. ह्या सगळ्याला कंटाळून राजाने एक योजना बनवली, आणि त्यानुसार आपली बहीण होलिका जिला वरदान मिळाले होते कि ती आगीवर विजय प्राप्त करू शकते तसेच कोणतीही आग तिला जाळू शकत नाही. राजाने होलिकेला भक्त प्रल्हादला घेऊन अग्नीच्या चितेवर बसण्यास सांगितले. प्रल्हाद आपल्या आत्यासोबत अग्नीच्या चितेवर बसला व भगवान विष्णूच्या नामस्मरणात लीन झाला आणि थोड्याच वेळात होलिका जळायला लागली आणि एक आकाशवाणी झाली आणि ज्यानुसार होलिकेला आठवलं की, तिला वरदानात असेही सांगितले होते कि ज्यावेळी ती तिच्या वरदानाचा दुरुपयोग करेल तेव्हा ती स्वतः जळून राख होईल. भक्त प्रल्हादला अग्नी काहीही करू शकला नाही मात्र होलिका त्या अग्नीत जळून भस्म झाली. अशा प्रकारे त्या दिवशी लोकांनी उत्सव साजरा केला आणि तो दिवस होळी दहन म्हणून ओळखला जाऊ लागला. दुसऱ्या दिवशी रंगाने हा सण उत्सवात मोठ्या उत्साहात सर्वत्र साजरा करतात

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test