पळशी ! अनंत आशा इंग्लिश मिडीयम स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात
पळशी (ता बारामती) येथील अनंत आशा इंग्लिश मिडीयम स्कूल व ज्युनियर कॉलेजने कलाविष्कार २०२४ हा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केला होता. हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष भाऊसाहेब करे, सरपंच ताई माणिक काळे, खरेदी विक्री संघ व्हॉईस चेअरमन सोनाली जायपत्रे व शारदा अकॅडमी चे संचालक सचिन नलावडे यांच्या हस्ते पार पडले. लहान गट ते अकरावीच्या विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमात सहभाग नोंदवला होता. यावेळी वर्षभर झालेल्या स्पर्धा व घेतलेल्या कार्यक्रमात यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला. लहान मुलांपासून ते अकरावीच्या विद्यार्थ्यांनी नृत्य सादर केले. यामध्ये हिरकणी थीम, चांद्रयान थीम, बाप थीम व रामायण थीम हुबेहूब सादर करत प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करून टाकले. कार्यक्रमासाठी पालकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. या कार्यक्रमाची कोरिओग्राफी योगेश ननावरे यांनी केली होती. सुत्रसंचलन बी जी पडवळ यांनी केले व आभार प्राचार्य सुनिल जानकर यांनी मानले. यावेळी सामाजिक राजकीय क्षेत्रातील पदाधिकारी शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, पालक वर्ग व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.