Type Here to Get Search Results !

सुनेत्रा पवारांना मिळालेल्या अभूतपूर्व पाठबळाने आमराई बहरली... पुष्पवृष्टी, फटाक्यांची आतशबाजी, वाद्यांच्या गजरातूनही सुनेत्रा पवार यांचे भव्य स्वागत

सुनेत्रा पवारांना मिळालेल्या अभूतपूर्व  पाठबळाने आमराई बहरली...

 पुष्पवृष्टी, फटाक्यांची आतशबाजी, वाद्यांच्या गजरातूनही सुनेत्रा पवार यांचे भव्य स्वागत
बारामती प्रतिनिधी:-
बारामती टेक्सटाईल पार्कच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी आज भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन केले आणि  बारामती शहरातील जनतेच्या सदिच्छा भेटीला सुरुवात केली.

बारामती शहरात सदिच्छा भेटी घेत असतानाच अनेकांचे सुनेत्रा पवार यांना अनेक फोन येत होते. त्यावर विचारणा होती, 'वहिनी तुम्ही आमच्याकडे केव्हा येणार?'.  जनतेतून अशा भावना व्यक्त झाल्या. पुष्पवृष्टी, फटाक्यांची आतशबाजी, वाद्यांच्या गजरातूनही सुनेत्रा पवार यांचे भव्य स्वागत झाले.

यावेळी आमराई परिसरातील बुरुड सोसायटी, वडार कॉलनी, सुहासनगर, चंद्रबननगर, कोअर हाऊस, वडकेनगर, भीमनगर, सिद्धार्थनगर यासह विविध ठिकाणी त्यांनी भेट दिली.

जय गणेश तरुण मंडळाच्या गणेश दर्शनाने  सदिच्छा भेटिना सुरुवात झाली. या दरम्यान, हजरत राजबाघसवार बाबा सय्यद ताजोद्दिन चिश्ती दर्गा येथे जाऊनही त्यांनी दर्शन घेतले. 

 माजी नगरसेविका सविता बबन लोंढे यांची प्रकृती ठिक नसल्या कारणाने सुनेत्रा पवार यांनी त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली. 

 या भेटीगाठी दरम्यान संपूर्ण आमराई परिसर राष्ट्रवादी काँग्रेस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यावरील प्रेमाने बहरून गेला होता.

यावेळी राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष जय पाटील, बारामती सहकारी बँकेचे अध्यक्ष सचिन सातव, महिला आघाडीच्या अध्यक्षा अनिता गायकवाड यांच्यासह विवीध सलचे, संघटनांचे पदाधिकारी, परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test