लोकसभा सार्वत्रिक निवडणूक अनुशंगाने वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन चे वतीने पथसंचलन /रूट मार्च
बारामती प्रतिनिधी
वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अनुशंगाने वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन चे वतीने सोमवार दि.११ रोजी पथसंचलन घेण्यात आले असून, सदर पथसंचालन कोऱ्हाळे खु!!, मुढाळे, सायंबाचिवाडी, यां गावात पथसंचलन /रूट मार्च करण्यात आला, आगामी लोकसभा निवडणूक अनुषंगाने गावात शांतता प्रस्तापित राहावी या उद्देशाने पथसंचलन /रूट मार्च काढण्यात आले.
पथसंचलन /रूट मार्च साठी पोलीस स्टेशन कडील सहा पोलीस निरीक्षक सचिन काळे, पो.स.ई, पांडुरंग कन्हेरे, समाधान लवटे, 14 पोलीस अंमलदार, ५ होमगार्ड, CISF चे २ अधिकारी व ३८ अंमलदार तसेच ३ वाहणे असे रूट मार्च (पथ संचलन) मध्ये सहभागी होते.