ताई ...मी घरगुती रेवडी बनवत आहे ....व्हा छान असे म्हणत खा सुप्रियाताई सुळे यांना रेवडी घेण्याचा मोह आवरला नाही
सोमेश्वरनगर प्रतिनिधी
यात्रा म्हणले की मिठाईवाले आलेच त्यामध्ये मग पेढे ,रेवडी,गोड शेंगदाणा बर्फी ,भेळ तसेच विविध प्रकारचे खाद्य प्रकार हा यात्रेनिमित्त दुकानदार व्यवसाय करत असतात असे असताना महाशिवरात्रीनिमित्त असंख्य मिठाईचे स्टॉल लागले होते आणि अचानक महाशिवरात्र निमित्त प्रसिद्ध श्री क्षेत्र सोमेश्वर शिवलिंग (ता बारामती)दर्शनासाठी खासदार सुप्रियाताई सुळे आले असता सर्व दुकानदार व्यावसायिक यांना भेट देत असताना एका पेढे व रेवडीच्या दुकानदारालाही त्यांनी भेट दिली व त्या दुकानदारांनी मी स्वतः घरगुती या रेवडी बनवत असतो असे म्हणताच...अरे वा असे म्हणत चल पॅक करून दे मग मी ते नक्की खाईन असे म्हणत त्या दुकानदाराकडून रेवडी घेण्याचा मोह खासदार सुप्रियाताई सुळे यांना आवरला नाही यामुळे दुकानदारालाही खूप आनंद झाला ....आमच्या मिठाई दुकानातून बारामती चा अभिमान असलेले संसदरत्न लोकप्रिय खासदार व माजी कृषिमंत्री शरदचंद्रजी पवारसाहेब यांच्या कन्या सुप्रियाताई सुळे यांनी माझ्या दुकानातून रेवडी पदार्थ घेतला त्यामुळे मी व माझे कुटुंब खूप आनंदी व तृप्त झालो असे दुकानदार व्यवसाय बाबू गायकवाड यांनी बोलताना सांगितले.