वंचित बहुजन आघाडीच्या तालुका युवा उपाध्यक्षपदी विश्वजीत चव्हाण यांची निवड
सोमेश्वरनगर - वंचित बहुजन आघाडीच्या बारामती तालुका युवा आघाडीच्या उपाध्यक्षपदी कोऱ्हाळे बुद्रुक येथील सामाजिक कार्यकर्ते विश्वजीत चव्हाण यांची निवड झाली आहे.
वंचित बहुजन आघाडीच्या युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष निलेश विश्वकर्मा यांनी विश्वजीत चव्हाण यांना निवडीचे पत्र दिले. निवडी नंतर बोलताना विश्वजीत चव्हाण म्हणाले की आगामी काळात बारामती तालुक्यातील प्रत्येक गावात वंचित युवा आघाडीची शाखा स्थापन करणार असून समाजातील विविध घटकांना एकत्र घेवून युवकांचे प्रश्न सोडविण्याचे काम राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर, युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष निलेश विश्वकर्मा, पुणे जिल्हा युवक आघाडीचे अध्यक्ष मंगलदास निकाळजे यांच्या मार्गदर्शनाखाली केले जाईल. विश्वजीत चव्हाण यांची निवड झाल्याबद्दल समतानगर येथील बौद्ध युवक संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी बौद्ध युवक संघटनेचे अध्यक्ष शेखर पानसरे, उपाध्यक्ष मंगेश चव्हाण, अनिल चव्हाण, धनंजय पानसरे, कैलास चव्हाण, जितेंद्र चव्हाण, दीपकुमार चव्हाण, स्वप्नील सोनवणे, निलेश सोनवणे उपस्थित होते.