Type Here to Get Search Results !

महापुरुषांच्या जयंती निमित्त समाजउपयोगी उपक्रम "८ नंबर बॉईज" ग्रुपच्या माध्यमातून अखंडित सुरूच...

महापुरुषांच्या जयंती निमित्त समाजउपयोगी उपक्रम "८ नंबर बॉईज" ग्रुपच्या माध्यमातून अखंडित सुरूच...

बारामती प्रतिनिधी -
छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले व भारतरत्न परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती महोत्सवानिमित्त  नगरपालिकेच्या 8 नंबर शाळा येथे शालेय साहित्य वाटप व मिशन बोर्डिंग येथे अन्नदानाचा कार्यक्रम संपन्न झाला. हा कार्यक्रम शनिवार दिनांक 13 एप्रिल रोजी सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, कला क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये व सन्मान सोशल फाउंडेशनच्या सर्व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा संपन्न झाला. दरवर्षी महापुरुषांच्या जयंतीनिमित्त विधायक उपक्रम 8 नंबर बॉईज या ग्रुपच्या वतीने आयोजित केले जातात.  तसेच यंदा वन्यजीवांना मुक्या प्राण्यांना ऐन उन्हाळ्यात पाण्याची वणवण करावी लागते त्या अनुषंगाने फॉरेस्ट विभागातील पानवठ्यांवर टँकरद्वारे पाणी देण्यात येणार आहे, असेही उपक्रम जयंती महोत्सवानिमित्त संपन्न होणार आहेत. यावेळी जयसिंग बबलू देशमुख नगरसेवक बानप, गणेश गुरव साहेब सहाय्यक व्यवस्थापक वन विभाग पुणे, शशांक भैय्या झगडे, ओंकार देशमुख, ओंकार जाधव, हर्ष बाळा मोरे,  सचिन जगदाळे, महेश गायकवाड, कुणाल काळे, आदित्य हिगणे, कल्पेश लोणकर, अभिजीत ओझर्डे, जयेश गायकवाड, विक्रांत आढाव, परशुराम भोसले, चेतन साळुंखे, सुरज साळुंखे, सुरज गायकवाड, योगेश नालंदे , एडवोकेट अमर गाढवे, अमोल बनकर, नितीन आप्पा मदने, गणेश मोरे, आसिफ सय्यद, अमोल सोनवणे, सॅम गायकवाड, अमोल वायदंडे, अमर अहिवळे, रोहित अहिवळे, सिद्धार्थ सोनवणे, रंजन लोहार, चेतन जावळे, मंगेश घनवट, सुमित जाधव, आकाश सोनवणे, चिन्मय कुलकर्णी आणि ग्रुपच्या सर्वच सदस्यांनी बहुमोल सहकार्य केले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test