Type Here to Get Search Results !

बारामती लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा अजित पवार यांची बारामती तालुक्यात गाव भेटीला सुरुवात

बारामती लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा अजित पवार यांची बारामती तालुक्यात गाव भेटीला सुरुवात

बारामती प्रतिनिधी - बारामती लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार म्हणून बारामती तालुक्यात गाव भेटी होत आहेत. त्याची सुरुवात माळेगाव खुर्द पासून झाली. या गावाने मला पहिल्यापासूनच खूप प्रेम दिले. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यावर जिवापाड प्रेम करणारे गाव आहे. अजितदादांनी आपल्या विकासाभिमुख कामातून प्रेमाचा हा सेतू बांधला आहे. त्याच प्रेमाची प्रचिती इथे आली. तुम्हाला इथे मते मागण्याची सुद्धा आवश्यकता नाही, असे अत्यंत मनापासून इथल्या सर्वांनी सांगितले. विधानसभेची विक्रमी मताधिक्याची परंपरा या निवडणुकीतही ठेवणार असल्याची ग्वाही सर्वांनी एकमुखाने दिली. 
आमची गौरी पवार ही खूपच छान बोलली. सुनील पवार यांनी मनोगतात विकासकामांचा आढावा घेतला. सरपंच आदित्य काटे यांनी सर्वांचे आभार मानले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर, माळेगाव कारखान्याचे चेअरमन ॲड. केशवबापू जगताप, बाजार समितीचे सभापती सुनील पवार, जिल्हा बँकेचे संचालक रणजीत तावरे, योगेश जगताप, दीपक तावरे, मदनराव देवकाते यांच्यासह विविध पदाधिकारी, संचालक, ग्रामस्थ उपस्थित होते. माळेगाव ग्रामस्थांनी केलेल्या स्वागताबद्दल सन्मानाबद्दल त्यांचे मनापासून आभार मानले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test