Type Here to Get Search Results !

शेतकरी कृती समितीचा सुनेत्रा पवार यांच्या प्रचारार्थ कार्यकर्तामेळाव्यात बिनशर्त जाहीर पाठीबा - सतिश काकडे.

शेतकरी कृती समितीचा सुनेत्रा पवार यांच्या प्रचारार्थ कार्यकर्तामेळाव्यात बिनशर्त जाहीर पाठीबा - सतिश काकडे.
सोमेश्वरनगर - बारामती तालुक्यातील गड़दरवाड़ी येथे अभिजित काकडे यांच्या फार्महाउसवर शेतकरी कृती समिती व काकडे गट तसेच सोमेश्वर पंचकोशी व पुरंदर तालुक्यातील कारखाना कार्यक्षशातील काही याये यांचा एकत्रित कार्यकता मेळावा सुनेत्रा अजित पवार यांच्या प्रचारार्थ त्यांना पाठींबा देण्यासाठी  पार पड़ला सदर मेळ्याव्यास  सतिश काकडे, प्रमोद काकड़े, अजय कदम, शहाजी जगताप, दिलीप फरादे, दिग्वीजय जगताप, संतोष कोंढाळकर, सतिशराव जगताप (मांडकी), नंदकुमार शिंगटे, वैभव गायकवाड, भाऊसो हुंबरे, हेमंत गायकवाड, दयानंद चव्हाण, बबलु सकुंडे, सुरेश शेंडकर,हरिभउ तावरे (मोरगाव), बाळासाहेब राउत, भाउसो भोसले, अजित माळशिकारे, पृथ्वीराज निगडे, दिग्वीजयमणर, बंटीराजे जगताप यांच्या प्रमुख प उपस्थितीत १००० कार्यकत्यांचा मेळावा संपन्न झाला, यामध्ये वरील मान्यवशंनी कार्यकत्यांसमोर मनोगत व्यक्त केली.
कार्यक्रमाचे अध्यक्षीय भाषणातून  सतिश काकडे यांनी उपस्थित सर्व कार्यकत्यांना मार्गदर्शन करताना या निवडणुकीत पवार कुटुंबाच्या अंतर्गत कलहात आपण लक्ष न देता सुनेत्रा पवार यांना चांगल्या मताधिक्य दिल्यास ते मत थेट देशाचे पंतप्रधान मोदी साहेब यांना मिळणार आहे,अजितदादा पवार यांचे मोदीसाहेब व अमित शहा साहेब यांच्याशी थेट संबंध असुन या दोघांच्या भेटीसाठी त्यांना  मध्यस्थीची गरज नाही. त्यामुळे बारामती तालुक्याच्या सर्वागीन विकासास मिळालेली गती पाहता उर्वरीत भोर, पुरंदर,खड़कवासला, दौंड, इंदापूर या तालुक्यांचा ही विकास होण्यासाठी केंद्र सरकारची मदत घेवुन, मतदार संघाचा सर्वागीन विकास करण्यासाठी सुनेत्रा पवार यांना स्थानिक गटा तटाचे राजकारण बाजूला ठेवून सर्वानी सुनेत्रा पवार यांना मोठया मताधिक्याने विजयी करण्याचे नम्र अवाहन केले. तसेच प्रत्येक गावात स्थानिक गटतटाच्या राजकारणाचा बऱ्याच जणाना त्रास होत आहे तसेच सोमेश्वर कारखान्याच्या उस तोड़ीच्या चुकीच्या धोरणामुळे  सभासदांना जो मनस्ताप झाला आहे. तो सर्व बाजुला ठेवुन शेतकरी कृती समितीच्यावतीने जाहीर बिनशर्त पाठींबा सुनेत्रा पवार यांना देण्याचा एकमुखी निर्णय वरील मेळ्ाव्यात घेण्यात आला. तसेच वरील सर्व बाबीवर न्याय मिळण्यासाठी निवडणुक झाले नंतर अजितदादा पवार यांना समक्ष भेटुन वरील सर्व बाबी त्यांचे कानावर घातल्या जातील व याबाबत १०० टक्के न्याय दादा अपणास देतील अशी हमी सर्व कार्यकरत्यंना कृती समितीच्या वतीने देण्यात आली.

सदर कार्यक्रमाचे आयोजन कारखान्याचे संचालक अभिजित सतिशराव काकड़े यांनी केले होते त्यांनी उपस्थित सर्व कार्यकत्याचे आभार मानून स्नेहभोजन देत मेळावा  पार पडला

■■ चौकट....
सोमेश्वर कारखान्याने सभासदांच्या जानेवारी मध्ये तुटणा्-या  उसास ७५/- रू फेबुवारी१००/-रू व मार्च महिन्यात तुटणा-या उसास १५०/- रू पर्यत प्रति मे. दन अनुदान जाहीर केलेहोते. तसेच एप्रिल पासुन तुटणा-या उसास २००/- रू प्र.मे. टन अनुदान ही मिळणार आहे. व ज्यासभासदांचे जळीत उसाचे अंदाजे २ लाख मे. टनाचे ५०/-रू प्र.मे. टन प्रमाणे कपात केले आहेत तेपैसे सुष्दा सभासदांना परत मिळणार आहेत तसेच लबकरच आजितदादा यांना भेटुन खोड़की बील३००/- रू प्र.मे.टन प्रमाणे कारखान्याच्या सर्व सभासदांना मिळण्यासाठी प्रयत्न करणार आहे की जे गेटकेन धारकांना मिळू शकत नाही अशी हमी कृती समिती अपणास देत आहे.




Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test