करंजे येथे "सोमेश्वर महाराज" यांचा
सोमवती पालखी सोहळा वाजतगाजत
सोमेश्वरनगर प्रतिनिधी - बारामती तालुक्यातील प्रसिद्ध सौराष्ट्रातील सोरटी सोमनाथ प्रतिरूप मानले जाणारे श्री क्षेत्र सोमेश्वर मंदिर,करंजे आहे , वर्ष्यातून असणाऱ्या प्रत्येक सोमवती आमावस्या निमित्त सोमेश्वर महाराज पालखी सोहळा मोठ्या उत्साहात पार पाडत असतो तसेच सोमवार दि ०९ रोजी असलेल्या सोमवारी सोमवती अमावस्या निमित्त सोमेश्वर महाराजांची मूर्तीपालखी सोहळा सोमेश्वर मंदिर करंजे येथून निरा स्नान उपस्थित मानकरी व पुज्यारी व ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत जात असते.... खांदेकरी मानकरी व पुजारी वर्ग यांच्या उपस्थितीत प्रस्थान होत असते, मूर्ती निरा स्नान होत निंबुत , वाघळवाडी तसेच करंजेपुल गायकवाडवस्ती मार्गे संध्याकाळी करंजे गाव येथे दाखल होते...या सोहळ्यानिमित्त श्री गणेश मित्र मंडळाच्या वतीने पुढील पालखी नियोजन केले जात असते...आजचा महाप्रसादाचे आयोजन संकेत सोमप्रसाद केंजळे यांनी होते तर शिवभक्तांना महाप्रसाद आस्वाद व्यवस्थे साठी करंजे तंटामुक्ती अध्यक्ष प्रतापअण्णा गायकवाड यांच्या मार्फत टेबल खुर्ची देण्यात आली ...या दिवशी करंजे ग्रामस्थ सह आलेले सर्व शिवभक्त महाप्रसादाचा आस्वाद घेत असतात ... सायंकाळची सोमेश्वर मूर्ती महाराजांची आरती पुजारी,ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत पार पडली..पालखी प्रस्थान मुख्य पेठेतून पालखी मिरवणूक निघते ....या पालखी सोहळ्यानिमित्त सडा रांगोळी तसेच राजेंद्र ननवरे (करंजे) यांच्या मार्फत पायघड्याळाचे आयोजन असते यावेळी ननवरे कुटुंब व मित्र परिवार एकत्र असतो...पालखी सोहळा यशस्वी पार पाडण्यासाठी करंजे ग्रामस्थ व जेष्ठ मंडळी कायम प्रतशील असतात.