Type Here to Get Search Results !

धनगर महिला भगिनी कडून महायुतीच्या उमेदवार सुनेत्रावहिनी पवार यांना काठी आणि घोंगडी देऊन सत्कार...!

धनगर महिला भगिनी कडून महायुतीच्या उमेदवार सुनेत्रावहिनी पवार यांना काठी आणि घोंगडी देऊन सत्कार...!
बारामती - महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा वहिनी पवार यांचा प्रचार दौरा पुरंदर हवेली परिसरातील देवाची उरळी येथे सुरू असताना एका धनगर वस्तीवर प्रचारासाठी गेल्या असता धनगर महिला भगिनींनी त्यांचे मोठ्या उत्साहात स्वागत करत बाळूमामा यांच्या मंदिरात काठी आणि घोंगडी देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी महिलांनी आपल्या पाण्यासंदर्भात व इतर अडचणी सुनेत्रावहिनी पवार यांना सांगितल्या. लवकर त्यावर तोडगा काढण्याची विनंती महिला भगिनींनी केली. त्यांच्या विनंतीला मान देत लवकरच आपण पाणी आणि तुमच्या इतर अडचणीवर उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांच्याशी चर्चा करून मार्ग काढण्याचा विश्वास सुनेत्रवहीनी पवार यांनी दिला.  तसेच निवडणुकीत महायुतीच्या घड्याळ या चिन्हाला मतदान करण्याचे आवाहन सुनेत्रावहिनी पवार यांनी केले.
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test