मुढाळे येथे आज शुक्रवार रोजी काल्याचे किर्तन
मुढाळे: प्रतिनिधी (शंतनु साळवे)
बारामती तालुक्यातील मुढाळे येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये समस्त ग्रामस्थ व भजनी मंडळ मुढाळे यांच्या सहकार्याने शुक्रवारी (दि.२४) अखंड हरिनाम सप्ताहास सुरुवात झाली. शुक्रवारी (दि.२४) सुरू झालेला अखंड हरिनाम सप्ताह आज शुक्रवार (दि.३१) पर्यंत असणार आहे.
व्यासपीठ चालक हभप मालनताई पवार व हभप कुंभार गुरुजी यांचे मार्गदर्शनाखाली पहाटे ४ ते ६ काकडा आरती, सकाळी ७ ते ११ व दुपरी ३ ते ४ श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, सायं ५ ते ६ हरिपाठ, रात्री ७ ते ९ महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार यांची कीर्तन सेवा सेवा झाली, रात्री ९ ते ११ महाप्रसाद व नंतर हरिजागर असा दिनक्रम होता.
गुरुवारी (दि.३०) भव्य दिंडी सोहळा पार पडला.
आज शुक्रवार (दि.३१) हभप हनुमंत मारकड यांचे काल्याचे कीर्तन सेवा होणार आहे. तसेच आज रात्री ८ वाजता हभप लक्ष्मण भगत यांचा भारुडाचा कार्यक्रम होणार आहे.
यंदाचे ३८ वे वर्ष आहे. सर्व हरी भक्तांनी आजच्या कार्यक्रमास उपस्थित राहून शोभा वाढवावी असे संत सेवा मंडळ व समस्त ग्रामस्थ मुढाळे यांच्याकडून आवाहन करण्यात आले आहे.