Type Here to Get Search Results !

मतदार आणि निवडणूक कर्मचाऱ्यांच्या आरोग्यासाठी मतदान केंद्रावर मेडीकल कीटची सुविधा....मतदान केंद्रांना मेडिकल कीटचे कृषी महाविद्यालय येथे वितरण

मतदार आणि निवडणूक कर्मचाऱ्यांच्या आरोग्यासाठी मतदान केंद्रावर मेडीकल कीटची सुविधा
मतदान केंद्रांना मेडिकल कीटचे कृषी महाविद्यालय येथे वितरण

पुणे : बारामती लोकसभा मतदार संघातील सार्वत्रिक निवडणूक येत्या ७ मे रोजी होणार असून उन्हाळ्यातील वाढते तापमान लक्षात घेता निवडणुकीसाठी नियुक्त अधिकारी, कर्मचारी तसेच मतदानासाठी येणाऱ्या मतदारांसाठी १ हजार ७२४ प्रथमोपचार पेट्या आणि प्रत्येक मतदान केंद्रासाठी १० ओआरएसच्या पाकिटांचे वितरण कृषी महाविद्यालय येथील वितरण केंद्रातून करण्यात आले.

मतदान केंद्रावर काही दुर्घटना उद्भवल्यास तात्काळ प्राथमिक उपचार देण्याच्या भारत निवडणूक आयोगाच्या सूचना आहेत. त्याअनुषंगाने बारामती लोकसभा मतदार संघातील दौंड विधानसभा मतदार संघासाठी २३२, इंदापूर २५२, बारामती २८०, पुरंदर २४४, भोर ५२५ व खडकवासला १९१ याप्रमाणे १ हजार ७२४ कीटचे वितरण करण्यात आले. तर २ हजार ५१६ मतदान केंद्राना २५१६० ओआरएसच्या पाकिटांचे वितरण करण्यात आले. 

प्रथमोपचार पेटीमध्ये बँडेज, कापूस, बीटाडाईन ट्यूब, अँटीसेप्टीक सोल्युशन, हातमोजे, पॅरासिटामॉल, रँनटीडीन टॅबलेट उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. किटचे वितरण सुलभतेने होण्यासाठी सर्व साहित्य असलेल्या प्रथमोपचार पेट्या पिशव्यांमध्ये भरुन पाठविण्यात आल्या. प्रत्येक पिशवीवर मतदारसंघाचे नाव लिहिण्यात आल्याने ती कीट मतदान केंद्रापर्यंत पोहोचविणे सोईचे होणार आहे. प्रथमोपचार साहित्य नेण्यासाठी विधानसभा मतदारसंघनिहाय वाहन व कर्मचाऱ्यांची व्यवस्था करण्यात आली होती.  

साहित्य व्यवस्थापन कक्षाच्या समन्वयक अधिकारी रेश्मा माळी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक समन्वयक अधिकारी सूर्यकांत पठाडे यांच्या उपस्थितीत मेडिकल कीटचे वितरण करण्यात आले. 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test