जितेंद्र आव्हाड यांच्यावर कारवाईसाठी राष्ट्रवादीचा सामाजिक न्याय विभाग आक्रमक
सोमेश्वरनगर - राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी महाड येथे आंदोलन करत असताना भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे पोस्टर फाडून समस्त भारतीयांच्या भावना दुखावल्याने पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचा सामाजिक न्याय विभाग आक्रमक झाला असुन त्याच्यावर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सामाजिक न्याय विभागाचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष हेमंत गडकरी यांच्या नेतृत्वात सामाजिक न्याय विभागाने यावेळी जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात बारामती तील वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात निवेदन दिले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष नानासाहेब मदने,युवा नेते माणिक काळे, आकाश वाघमारे, विशाल जाधव, पांडुरंग पवार, देवेंद्र खुडे उपस्थित होते. यावेळी वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक पांडुरंग कन्हेरे यांनी निवेदन स्वीकारले.