करंजेतील श्री क्षेत्र सोमेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्टच्या चेअरमन पदी अनंत मोकाशी.
सचिव पदी विपुल भांडवलकर तर खजिनदार सचिन भांडवलकर.
सोमेश्वर प्रतिनिधी - बारामती तालुक्यातील प्रसिद्ध सोरटी सोमनाथाचे प्रतिरूप मानले जाणारे करंजेतील श्री क्षेत्र सोमेश्वर देवस्थान ट्रस्टची त्रिवार्षिक निवडणूक (सण २०२४ ते २७ )सोमेश्वर मंदिर येथे रविवारी दि ९ रोजी पार पडली यामध्ये चेअरमन पदासाठी अनंत वामन मोकाशी यांना अधिकाधिक मताधिक्य असल्याने अनंत मोकाशी यांची निवड करण्यात आली तर सचिव म्हणून विपुल विलास भांडवलकर तर खजिनदार सचिन सतीश भांडवलकर यांची निवड झाली तर नवनिर्वाचित विद्यमान विश्वस्त मंडळ पुढील प्रमाणे
मोहन मुरलीधर भांडवलकर,प्रताप मारुती भांडवलकर,रूपचंद (अक्षय)बाळासो भांडवलकर,
अमोल बाळासाहेब भांडवलकर ,प्रदीप बबन भांडवलकर, तसेच पदसिद्ध विश्वस्त म्हणून श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखाना चेअरमन असतात.
या निवडणूक प्रक्रिये दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून वडगाव निंबाळकर पोलीस ठाणे अंकित करंजेपूल दुरक्षेत्राचे पोलीस उपनिरीक्षक दीपक वारुळे व पोलीस कॉन्स्टेबल नागनाथ परगे उपस्थित होते तर निवडणूक अधिकारी म्हणून सुभाष दगडे, सुनील जोशी,शाहजी नाईक,सुनील शिंदे यांनी काम पाहिले.
◆------------------------------------------------------◆
महराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातुन सोमेश्वर शिवलिंग दर्शनासाठी येणाऱ्या शिवभक्तांसाठी अधिकाधिक सुख-सुविधा देणार तर पारदर्शक कारभार करत प्रलंबित मंदिर व मंदिर परिसरातील विविध विकासकामे पूर्ण करणार.
नवनिर्वाचित देवस्थान चेअरमन-अनंत मोकाशी