स्तुत्य उपक्रम ! श्री सोमेश्वर मंदिर परिसरात वृक्षारोपण
पुणे प्रतिनिधी
ग्रेट व्हिजन इंग्लिश स्कूल निगडी यांच्या वतीने शालेय ज्ञानारंभ् दिन निमित्त वृक्षारोपण कार्यक्रम पुणे तील निगडी रुपिनगर येथील श्री सोमेश्वर मंदिर परिसरात संपन्न झाला.या कार्यक्रमास शाळेतील विद्यार्थी, शिक्षक व संचालक मंडळ यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद व सहभाग नोंदवला सध्या शहरात वाहनांची संख्या वाढल्यामुळे पर्यावरणात प्रदूषणाचे ही प्रमाण वाढलेले आहे या अनुषंगाने या सदर उपक्रमाने पर्यावरनाचा समतोल राखण्यास मदत होणार आहे
सदर आयोजित वृक्षारोपण या कार्यक्रमास मुख्याध्यापिका प्रिती लोंढे व चेअरमन ॲडव्होकेट बजरंग पवळे यांनी उपस्थित असणाऱ्या सर्व शालेय विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या क्रीडा प्रमुख संचालक उमेश लोंढे यांनी आयोजन केले तर शिक्षिका सौ.नीलम यांनी आभार मानले.