सर्वत्र वटसावित्री पौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी!
सोमेश्वरनगर प्रतिनिधी :-महाराष्ट्रात सण,व्रत वैकल्यांना फार महत्त्व आहे. जेष्ठ महिन्यातील पौर्णिमेला म्हणजेच वटपौर्णिमचं एक वेगळंच महत्त्व आहे. आज शुक्रवारी दि २१ रोजी परिसरातील करंजेगावं, करंजेपुल , वाणेवाडी,मुरूम, वाघळवाडी,सोरटेवाडी, निंबुत, खंडोबाचीवाडी, गरदारवाडी,चौधरवाडी, मगरवाडी, वाकी, चोपडज,होळ,वडगांव,को-हाळ सह इतर वाडी वस्तीवर च्या भागात वटपोर्णिमेचा उत्साह पाहायला मिळाला. मोठ्या प्रमाणावर महिलांनी हा सण साजरा केला.
या दिवशी स्त्रिया वटपौर्णिमेचं व्रत करतात. तसेच झाडाभोवती कच्चा धागा गुंडाळून सात परिक्रमा करतात. या व्रतादरम्यान विवाहित स्त्रिया आपल्या पतीला उत्तम आरोग्य लाभावे, दीर्घायुष्य प्राप्त व्हावे म्हणून वडाच्या झाडाची पूजा करतात. या व्रतादरम्यान विवाहित स्त्रिया आपल्या पतीला उत्तम आरोग्य लाभावे, दीर्घायुष्य प्राप्त व्हावे, यासाठी प्रार्थना करतात आणि मनोभावे वडाच्या झाडाची पूजा करतात. वडाच्या वृक्षाचे आयुष्य जास्त असते. तसेच त्याच्या पारंब्यांचा विस्तारही खूप मोठा होतो. त्याचप्रमाणे नैसर्गिकतः दीर्घायुष्य लाभलेल्या वडाच्या वृक्षाप्रमाणे आपल्या पतीला आणि कुटुंबीयांना आरोग्यसंपन्न दीर्घायुष्य लाभावे, या साठी मनोभावे वडाच्या झाडाची पुज्या करतात असे उपस्थित महिलांनी बोलताना सांगितले.