Type Here to Get Search Results !

धक्कादायक बातमी...विद्यालयाचा मुख्याध्यापक लाचलुचपतच्या जाळ्यात

धक्कादायक बातमी...विद्यालयाचा मुख्याध्यापक लाचलुचपतच्या जाळ्यात

एक मुख्याध्यापक लाचलुचपतच्या जाळ्यात अडकला आहे. १२ वी पासचा शाळा सोडल्याचा दाखल्याची दुय्यम प्रत देण्यासाठी त्याने ३ हजार रुपयांची लाच मागितली होती. याविषयी  तक्रार दाराने तक्रार  केली केली होती. धनराज सखाराम सोनवणे (वय ५५ वर्ष मुख्याध्यापक, रामराव पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, केज ता. केज जि.बीड रा.सारणी आनंदगाव ता. केज जी.बीड (वर्ग ३) असे या मुख्याध्यापकाचे नाव आहे. सापळा रचून विद्यालयाच्या गेटसमोर लाच घेताना त्यास रंगेहाथ पकडले.

अधिक माहिती अशी की....तक्रारदार यांनी १२ वी पासचा शाळा सोडल्याचा दाखल्याची दुय्यम प्रत मिळण्यासाठी अर्ज केला होता. सदर अर्जावरून १२  वी पास चा शाळा सोडल्याचा दाखल्याची दुय्यम प्रत देऊ करण्यासाठी लोकसेवक सोनवणे यांनी तक्रारदार यांचेकडे पंचासमक्ष ३००० रू. लाचेची मागणी करून लाच रक्कम स्वीकारण्याचे मान्य करून ३००० रू. लाच रक्कम पंचासमक्ष स्वतः स्वीकारली. तर लाचेच्या रकमेसह रंगेहाथ पकडले म्हणून त्यांचे विरुद्ध पोलीस ठाणे केज येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असल्याची माहिती समजली आहे. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की त्यांचेकडे कोणत्याही

शासकीय अधिकारी कर्मचारी यांनी किंवा त्यांचे वतीने खाजगी इसम कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर फी व्यतिरिक्त अन्य लाचेची मागणी करीत असल्यास तात्काळ अमाचेशी संपर्क साधावा असे आवाहन लाचलुचपत विभागाने केले आहे.या संदर्भात पोलीस निरीक्षक युनूस शेख,सुरेश सांगळे, श्रीराम गिराम, हनुमान गोरे, भरत गारदे, अविनाश गवळी, गणेश मेहेत्रे, स्नेहलकुमार कोरडे आदींच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test