श्री क्षेत्र सोमेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्टचे नवनिर्वाचित चेअरमन सचिव व विश्वस्त यांचा सत्कार
सोमेश्वर प्रतिनिधी - बारामती तालुक्यातील प्रसिद्ध सोरटी सोमनाथाचे प्रतिरूप मानले जाणारे करंजेतील श्री क्षेत्र सोमेश्वर देवस्थान ट्रस्टची त्रिवार्षिक निवडणूक (सण २०२४ ते २७ ) पार पडली यामध्ये चेअरमन पदी अनंत वामन मोकाशी यांची निवड झाली तर सचिव म्हणून विपुल विलास भांडवलकर तसेच सत्कार प्रसंगी उपस्थित विश्वस्त रुपचंद(अक्षय) भांडवलकर ,मोहन भांडवलकर, प्रदीप भांडवलकर निवड झाली असल्याने यांचा सत्कार शाल पुष्पहार देत सत्कार करण्यात आला...तसेच या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगतात सोमेश्वर देवस्थान ट्रस्ट नवनिर्वाचित पदाधिकारी यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देत सोमेश्वर मंदिर व मंदिर परिसरातील प्रलंबित विकासकामे करावीत असेही सूचना करण्यात आल्या तसेच नवनिर्वाचित चेअरमन अनंत मोकाशी यांनी विश्वस्त मंडळ यांच्या वतीने सत्कार स्वीकारत मनोगतात केलेल्या सूचनांचा नक्कीच पूर्णत्वाला नेल्या जातील असे सांगत धन्यवाद मानले.
याप्रसंगी श्री सोमेश्वर सह साखर कारखाना माजी संचालक विशाल गायकवाड,करंजे माजी उपसरपंच बुवासाहेब हुंबरे, श्री सोमेश्वर सेवाभावी संस्था अध्यक्ष सुखदेव शिंदे, चौधरवाडी माजी उपसरपंच तानाजी भापकर,करंजे तंटामुक्ती अध्यक्ष प्रताप गायकवाड, शिवसेना विभाग प्रमुख बंटी गायकवाड, भारतीय पत्रकार संघ बारामती तालुकाध्यक्ष विनोद गोलांडे,सोमेश्वर पंचक्रोशीतील सामजिक कार्यकर्ते शिवाजी शेंडकर, सोमनाथ देशमुख,चारुहांस शिंदे हेमंत भांडवलकर,रमेश भांडवलकर ,दीपक गाडेकर,पुरोहित मुकेश भांडवलकर,पुजारी संभाजी भांडवलकर आदी मान्यवर उपस्थित होते.