Type Here to Get Search Results !

पुणे ! पुणे विभागाचे आयसीटी संगणक प्रयोगशाळा व्यवस्थापन मार्गदर्शन कार्यशाळा

पुणे ! पुणे विभागाचे आयसीटी संगणक प्रयोगशाळा व्यवस्थापन मार्गदर्शन कार्यशाळा 
सोमेश्वरनगर  - महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई यांच्या वतीने पुणे,विभागातील सांगली, सातारा,सोलापूर, पुणे व कोल्हापूर जिल्ह्यात संगणक प्रशिक्षकांनाप्रशिक्षण देण्यासाठी आझम कॅम्पसपुणे येथे एकदिवसीय प्रशिक्षण कार्यशाळा शनिवारी संपन्न झाली.

पुणे  व सांगली जिल्हा समन्वयक संतोष गोलांडे ,अक्षय वढणकर यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली.

एकदिवसीय प्रशिक्षण कार्यशाळेचे उद्धाटन हिना कौसर यांच्या शुभ हस्ते करण्यात आले.यावेळी पुणे विभाग प्रमुख प्रफुल हिवाळे, जिल्हा व्यवस्थापक तसेच विभागातील सर्व जिल्हा व तालुका समन्वयक, तसेच संगणक प्रशिक्षक उपस्थित होते. महाराष्ट्रातील २२७३ शाळांमधील पुणे विभागातील २००पेक्षा जास्त प्रशिक्षकांना प्रशिक्षण देण्यात आले आहे
सांगली जिल्ह्यात आयसीटी प्रशिक्षण राबविण्यात येत आहे.जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना संगणकज्ञान व्हावे, या उद्देशातून समग्रशिक्षा अभियानांतर्गत जिल्ह्यातील विविध माध्यमिक शाळांमध्ये संगणक प्रयोग शाळा व संगणक प्रशिक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे.जुलै महिन्यापासूननवीन शैक्षणिक सत्राची सुरुवात होणार असून, त्यांची प्रशिक्षकांचे एकदिवसीय प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते.त्यामध्ये विद्यार्थ्यांना संगणक साक्षर करणे ग्रामीण भागातील विद्यार्थी शहरीभागातील विद्यार्थ्यांच्या  मागे राहनयेत याची खबरदारी घेणे, शालेय अभ्यासासोबत संगणक व इंटरनेट यांच्या मदतीने शालेय अध्यापन करणे, अशा विविधबाबींबद्दल या एकदिवसीय प्रशिक्षण देण्यात आले. विषय शिक्षकांनात्यांच्या विषयात संगणकाची मदतदेत अध्यापन कसे करावि याबद्दलही मार्गदर्शन करण्यात आले. शाळेमध्ये शालेय कामकाजात संगणकाची मदत विद्यार्थ्यांनसाठी ऑनलाइन असलेले 'ई लनिंग' सॉफ्टवेअर यांची माहिती व प्रशिक्षणही देण्यात आले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test