Type Here to Get Search Results !

बारामती ! रोटरी डिस्ट्रिक्टच्या छत्रछाया प्रकल्पाच्या अंतर्गत बारामती रोटरी क्लबच्या वतीने गरजूंना छत्र्यांचे वाटप

बारामती ! रोटरी डिस्ट्रिक्टच्या छत्रछाया प्रकल्पाच्या अंतर्गत बारामती रोटरी क्लबच्या वतीने  गरजूंना छत्र्यांचे वाटप
बारामती - रोटरी डिस्ट्रिक्टच्या छत्रछाया प्रकल्पाच्या अंतर्गत बारामती रोटरी क्लबच्या वतीने  गरजूना छत्र्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी रोटरी क्लब ऑफ बारामतीचे अध्यक्ष रो. अरविंद गरगटे, सचिव रो. रविकिरण खारतोडे, सहाय्यक प्रांतपाल रो. दत्ता बोराडे,पब्लिक इमेज डायरेक्टर रो. प्रा. डॉ. अजय दरेकर रोटरी डिस्ट्रिक्ट 3131 चे ट्रेनर रो. प्रा. डॉ. हणमंतराव पाटील, सेवा प्रकल्प संचालक रो. सचिन चावरे आदी मान्यवर उपस्थित होते.
रोटरी वर्ष 2024-2025 वर्षासाठीचे रो. डिस्ट्रिक्ट 3131 चे प्रांतपाल रो. शीतल शहा यांचा "छत्रछाया" प्रकल्प हा ड्रीम प्रोजेक्ट आहे. या प्रकल्पामध्ये पुणे आणि रायगड जिल्ह्यातील सुमारे 150 रोटरी कलबच्या वतीने गरजू व्यक्तींना आणि छोटया व्यवसायिकांना मोफत छत्र्यांचे वाटप करण्यात येत आहे. बारामती रोटरी क्लबच्यावतीने अशा 20 व्यक्तींची निवड करण्यात आली असून यातील पहिल्या टप्प्यातील गरजूना छत्र्यांचे वाटप करण्यात आले आहे. यामध्ये 1.सुशीला सातपुते, ऐश्वर्या कॉर्नर,एम आय डी सी, बारामती 
2.आकांक्षा अतुल क्षीरसागर, श्रीराम नगर, भिगवण रस्ता, बारामती 
3.सुमन त्रिंबक जमदाडे, इंदापूर चौक, बारामती 
4.ज्ञानेश्वर अंकुश म्हस्के, कारखाना रोड,माळेगाव
5.जानकी सावळराम धोत्रे,माळेगाव बारामती रस्ता, माळेगाव यांना त्यांच्या व्यवसायाच्या जागेवर जाऊन छत्री प्रदान करण्यात आली. रोटरीच्या छत्रछाया प्रकल्पामुळे या व्यक्तींना पाऊस, आणि उन्हापासून संरक्षण मिळण्यासाठी मदत होईल अशी अपेक्षा अध्यक्ष रो. अरविंद गरगटे यांनी व्यक्त केली.
1.सुशीला सातपुते या आपल्या पतीच्या निधनानंतर आपल्या चप्पल दुरुस्तीचे दुकान एमआयडीसीच्या विद्या कॉर्नर चौकातील ऐश्वर्या बेकरीजवळ चालवतात. दररोज 100-150 रुपयांचा व्यवसाय त्या करतात.
2.भिगवण रस्त्यावरील दूध संघाच्या सोसायटीच्या रस्त्याला आकांक्षा अतुल क्षीरसागर यांचे भाजीपाला आणि फळे यांचे दुकान आहे. आपले पती अतुल क्षीरसागर यांना मदतीला घेऊन आकांक्षा आपलं कुटुंब चालविण्यासाठी हातभार लावतात.
3.सुमन त्रिंबक जमदाडे या 70 वर्षाच्या आजीबाई इंदापूर चौकात आपले छोटेसे फळांचे दुकान चालवतात.
4.माळेगावातील ज्ञानेश्वर अंकुश म्हस्के कारखाना रस्त्यावर हे 75 वर्षाचे आजोबा आपला चप्पल दुरुस्तीचा व्यवसाय करतात.
5.माळेगाव बारामती रस्त्यावर माळेगाव नजिक दगडाच्या पाटा वरवंटा आणि खलबत्याचा व्यवसाय करणाऱ्या जानकी सावळराम धोत्रे यांनाही यावेळी छत्री प्रदान करण्यात आली. रोटरी डिस्ट्रिक्ट 3131 च्या छत्रछाया प्रकल्पामध्ये रोटरी क्लब ऑफ बारामतीने छत्री प्रदान केल्याबद्दल सर्व लाभार्थीनी बारामती रोटरी क्लबला धन्यवाद दिले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test