सोमेश्वरनगर ! विद्या प्रतिष्ठानमध्ये वचनग्रहण सोहळा संपन्न.
सोमेश्वरनगर - विद्या प्रतिष्ठानचे सोमेश्वर इंग्लिश मिडीयम स्कूल व ज्युनिअर कॉलेज सी.बी.एस.ई वाघळवाडी (ता बारामती) येथील शाळेमध्ये शैक्षणिक वर्ष २०२४-२०२५ साठीचा विद्यार्थी प्रतिनिधींचा वचन ग्रहण सोहळा संपन्न झाला.
शाळेतील इयत्ता सहावी ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी लोकशाही पद्धतीने आपल्या विद्यार्थी प्रतिनिधी निवडला.
ही सर्व मतदान प्रक्रिया सर्व विद्यार्थ्यांनी लोकशाही तत्वाची काटेकोरपणे पालन करत पार पाडली. दिनांक १८ एप्रिल रोजी विद्यार्थी प्रतिनिधी निवडीसाठी ची घोषणा झाली. त्यानंतर उमेदवारी अर्ज भरणे, समर्थन गोळा करणे ,अर्ज माघारी अशा अनेक प्रक्रिया मुलांनी पार पाडल्या.
विद्यार्थ्यांमध्ये जोरदार प्रचार करणे तसेच भाषणांमधून आपली कार्यपद्धती मांडून मते मागणे अशा अनेक बाबींचा मुलांनी अनुभव घेतला. दिनांक २६ एप्रिल रोजी प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया पार पडून सर्व विद्यार्थी प्रतिनिधीचे भविष्य मत पेटीत बंद झाले.
त्यानंतर मतमोजणी मधून विजय उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली व दिनांक १२ जुलै रोजी सर्व प्रतिनिधींना आपल्या कामाशी एकनिष्ठ राहण्याची प्रतिज्ञा देण्यात आली. यावेळी शाळेतील विद्यार्थी विद्यार्थी प्रतिनिधी व त्यांचे पालक, शिक्षक व शाळेचे मुख्याध्यापक श्री सचिन पाठक सर उपस्थित होते.
अतिशय शिस्तबद्ध संचालनाने या कार्यक्रमाची सुरुवात झाली. विद्यार्थी प्रतिनिधींना शाळेच्या मुख्याध्यापकांनी शपथ ग्रहण करायला सांगितली.
यावेळी मुख्याध्यापक श्री सचिन पाठक यांनी वचनबद्ध विद्यार्थी प्रतिनिधींना त्यांच्यावर असणाऱ्या जबाबदारी जाणीव तसेच कार्यक्षम पद्धतीने कामकाज करण्यासाठी शुभेच्छा दिल्या.
या सर्व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेतील शिक्षिका साधना शिंदे यांनी केले. सदर निवडणूक प्रक्रिया व वचनग्रहण समारंभाचे नियोजन समाजशास्त्र विभाग प्रमुख सचिन निंबाळकर सर यांनी केले. शाळेच्या ध्येयगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.