वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष पुणे जिल्हा व डॉ श्रीकांत शिंदे फाउंडेशन यांच्या वतीने मोफत कृत्रिम अवयव वाटप शिबिर संपन्न.
बारामती प्रतिनिधी - महाराष्ट्र सरकार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली द्वितीय वर्षे पूर्ण झाल्याबद्दल शिवसेना पुणे जिल्हा महिला आघाडी व वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष पुणे जिल्हा व डॉ श्रीकांत शिंदे फाउंडेशन यांच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार श्रीकांत शिंदे यांच्या सूचनेनुसार मंगेश चिवटे मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष प्रमुख तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विशेष कार्यकारी अधिकारी (OSD) व रामहरी राऊत शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख महाराष्ट्र राज्य यांच्या मार्गदर्शनाखाली ज्या दिव्यांग बांधवांना हात नाही किंवा पाय (अवयव) नाहीत अशा दिव्यांग बांधवांसाठी मोफत कृत्रिम हात व पाय वाटप शिबिरांचे आयोजन डॉ श्रीकांत शिंदे फाउंडेशन व रत्ननिधी चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या सौजन्याने इंदापूर येथे दिनांक १ जुलै २०२४ रोजी उपजिल्हा रुग्णालयात करण्यात आलेले होते. या कार्यक्रम प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाप्रमुख महेशदादा पासलकर होते तर बारामती लोकसभा मतदारसंघ महिला संपर्क प्रमुख गीतांजलीताई ढोणे, बारामती तालुका प्रमुख स्वप्निल जगताप यांच्या शुभहस्ते संपन्न झाला .