परभणी टेनिस क्रिकेट असोसिएशन च्या वतीने १७ वर्षाखालील टेनिस क्रिकेट संघ निवड चाचणीचे आयोजन
महाराष्ट्र राज्य टेनिस क्रिकेट असोसिएशन व पुणे जिल्हा टेनिस क्रिकेट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 17 वर्षाखालील राज्यस्तरीय टेनिस क्रिकेट स्पर्धा बारामती या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या आहेत. सदरील स्पर्धेत परभणी जिल्हा टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या वतीने मुले व मुलींचे संघ सहभागी होणार आहेत. याकरिता परभणी जिल्हा संघाची निवड चाचणी दिनांक 1 ऑगस्ट 2024 रोजी जी.एम. वस्तनवी उर्दू महाविद्याल, पोखरणी रोड, पाथरी च्या मैदानावर आयोजित करण्यात आली आहे. निवड चाचणीची वेळ सकाळी 10 ते 2 वाजेपर्यंत असेल. ज्या खेळाडूंचा जन्म 1 जानेवारी 2008 किंवा त्यानंतर झालेला आहे, अशा खेळाडूंनी आपल्या नावाची नोंदणी 9881620929, 7517831818 आणि 9325584737
या क्रमांकावर करून निवड चाचणीच्या दिवशी आपल्या सोबत आधार कार्डची झेरॉक्स, जन्म प्रमाणपत्र ची झेरॉक्स, बोनाफाईड प्रमाणपत्र घेऊन निवड चाचणी स्थळी उपस्थित रहावे.
नोंदणी करण्यासाठी शेवटची तारीख दिनांक 30 जुलै 2024 रोजी सायंकाळी 5 वाजे पर्यंत राहील. उशिरा नोंदणी केलेल्या खेळाडूंना संधी दिली जाणार नाही याची नोंद घ्यावी. तसेच वेळेचे आत नावाची नोंदणी करण्याचे आवाहन परभणी जिल्हा टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या वतीने करण्यात आले आहे.